सरकारच्या चांगल्या कामांची प्रसिध्दी कऱणं हे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचं काम आहे असं म्हणता येईल पण हा विभाग आपलं काम व्यवस्थितपणे करीत आहे काय या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल.सरकार आणि पत्रकार यांच्यातील दुवा म्हणून देखील हा विभाग व्यवस्थित काम करीत नसल्याचं वारंवार लक्षात आलेलं आहे.त्यामुळं केंद्रांचं सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि राज्य सरकारचं माहिती आणि जनसंपर्क विभाग बंद करावा अशी सूचना अनेकदा संतापानं केली जाते.मात्र यावर आता खरोखरच विचार कऱण्याची वेळ आली असून पांढरा हत्ती बनलेला हा विभाग बंद केला पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.दिल्लीतील एका कार्यक्रमात हाच प्रश्न सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना विचारला गेला तेही सूचना आणि प्रसारण मंत्रालय बंद करण्याच्या बाजुने असल्याचे दिसून आले.अन्य अनेक लोकशाही देशात सूचना आणि प्रसारण मंत्रालय नावाची व्यवस्था नाही.

LEAVE A REPLY