कर्जतमध्ये वादळी पाऊस

0
870

नेरळ,७बातमीदार 
आज वातावरणातील प्रचंड उष्मामुले हैराण झालेल्या रहिवाशांना दुपारी वादळी वार्यासह आलेल्या पावसाने दिलासा दिला . मात्र या वादळी पावसात कर्जत रेल्वे स्थानकात मोठे झाड कोसळले . त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक सायंकाळ पर्यंत थांबविण्यात आली आहे . दरम्यान ,मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी पावसाने कर्जत शहर आणि परिसरातील गावातील शेतकरी आणि नागरिक यांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत .                           दुपारी साडेतीन वाजता कर्जत स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावुस आला . त्यावेळी इएमयु फलाटवर मुंबई ला जाणारी लोकाल थांबली होती . तर फलाट एक वर मोठ्या प्रमाणात प्रवाशी पुण्याकडे जाणार्या गाडीची वाट पाहात होते . त्यावेळी त्या फलाटावरील स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयावर पाठीमागे असलेल्या जुन्या पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली . काही कळायच्या आत तेथील इंदीकेटर जवळ तीन वेळा मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाले . झाडाच्या फांद्या या फलाटावरील पत्राच्या शेडवर अडकून पडल्या होत्या . त्या फांद्या जर ओवरहेड वर कोसळल्या असत्या तर ,मोठा अनर्थ घडला असता . स्टेशन प्रबंधक कार्यालयावर ज्यावेळी झाडाच्या फांद्या पडल्या ,त्यावेळी कर्जत स्टेशन प्रबंधक एन एम राठोड कार्यालयात होते . त्यांनी परिसरातील सर्व प्रवाशांना फलाटावरून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या . पोलिस आणि आरपीफ जवान यांनी फलाट एक चा ताबा घेवून सर्व प्रवाशंना सुरक्षित ठिकाणी हलविले ,त्यानंतर ईएमयु फलाटावर असलेली मुंबईला जाणारी लोकल सोडण्यात आली . 
             मात्र या घटनेमुळे पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या काही काळासाठी अन्य स्थानकांवर थांबविण्यात आल्या . त्यात सिंहगड express भिवपुरी रोड स्थानकातील क्रोस्सिंगला तर ,कन्याकुमारी हि लांब पल्ल्याची गाडी नेरळ स्टेशन वर सायडिंग ला लावण्यात आली . मात्र कर्जत स्थानकात ओवरहेड ला कोणताही धक्का न लागल्यामुळे अखेर तासभर उशिराने गाड्या त्याच फलाटावरून पुण्याकडे रवाना झाल्या . 
दुसरीकडे संपूर्ण कर्जत तालुक्याला आज दुपारी आलेल्या वादळी पावसाने झोडपले ,त्यात वादळामुळे प्रामुख्याने कर्जत शहर आणि परिसरातील गावांमधील शेतकरी आणि नागरिक यांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत . जसे कर्जत रेल्वे स्टेशन प्रबंधक कार्यालयात पाणी साचले आहे . तसेच पाणी कर्जत तालुक्यातील छपरे उडालेल्या घरात साचून राहिले आहे . त्यातील नुकसानीची माहिती तहसील कार्यालातून आता पर्यंत प्राप्त झाली नाही . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here