रायगड जिल्हयातील कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश लाड यांचा दोन मतांनी विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे मुकेश पाटील यांचा पराभव केला. उप-नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लालधारी पाल यांची निवड झाली. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा तर शिवसेना भाजप महायुतीला आठ जागा मिळाल्या होत्या.राजेश लाड यांची निवड होताच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने यश संपादन केले होते.