एव्हरेस्ट विरासच टाकले वाळित

  0
  834

  रायगडमध्ये वाळितच्या वाळवीची वळवळ
  अलिबाग ( प्रतिनिधी) पत्नी परजातीय आहे आणि ती गावात जीन्स आणि टी शर्ट घालते या कारणांवरून आपणास गावकीनं वाळित टाकल्याची तक्रार एव्हरेस्टवीर राहूल येलंगे यांंनी पोलादपूर तालुका वाळित प्रकरण समन्वय समितीच्या बैठकीतच काल केल्याने खळबळ उडाली आहे.अनेक प्रयत्न केल्यानंतरही जिल्हयातील वाळित प्रकऱणं थांबण्याचं नाव घेत नाहीत हेच या नव्या प्रकऱणानं समोर आलं आहे.
  राहूल येलंगे यांनी पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर तो दुग्धव्यवसाय करण्यासाठी आपल्या भोगाव येलंगवाडी या मुळगावी गेला.मात्र त्यंाची पत्नी अन्य जातीच्या असल्याचे कारण सांगत त्याला गावकीनं वाळित टाकून त्रास द्यायला सुरूवात केली.त्याच्या विरूध्द खोटया तक्रारी देखील दिल्या गेल्या .त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या राहूल येलंगे यांनी काल झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत तहसिलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली कौफियत मांडली.
  दरम्यान रायगड जिल्हयातील वाळित प्रकरणी पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात वाळित प्रकरण समन्वय समित्या स्थापन करून जनजागृती करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हयीतील सर्व पोलिस ठाण्यात अशा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत.काल पोलादपूर बरोबरच महाड,कर्जत आणि अन्य काही ठिकाणी या समित्यांच्या बैठका पार पडल्या.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here