कोकण विभागीय आयुक्तांनी सुरू केलेल्या एक दिवस शाळेसाठी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत असून रायगड जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत.जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अविनाश गोटे यांनी काल अलिबाग तालुक्यातील वळवली येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याशी संवाद साधला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अधय्क्ष देविदास पाटील तसेच अन्य नागरिक,विद्यार्थी उपस्थित होते.कोकण विभागातील अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन विध्यार्थँाशी आणि पालकांशी संवाद साधावा अशी ही योजना असून या कल्पनेमुळे पालकांचा जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला मदत होत आहे

LEAVE A REPLY