नवी दिल्लीः आपले कर्तव्य बजावताना आज दोन पत्रकारांची हत्त्या केली गेली.पहिली घटना छत्तीसगढमध्ये तर दुसरी घटना झारखंडमध्ये घडली.
छत्तीसगढमध्ये दंतेवाडा अरनपूर भागात नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात कॅमेरामन अच्युतानंद साही ठार झाले.अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील या हल्ल्यात शहीद झाले.एक पत्रकार मात्र थोडक्यात बचावला.सध्या छत्तीसगढमध्ये निवडणुका सुरू आहेत.या निवडणुकांचे कव्हरेज करण्यासाठी दूरदर्शनचे पथक गेले होते.अरनपूर भागात नक्षलवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलेले आहे.तेथे गेलेल्या दूरदर्शन पथकावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला चढविला.
दुसर्या घटनेत झारखंड येथील चतरा जिल्हयात चंदन तिवारी नावाच्या एका पत्रकारांच्या हत्या केली गेली.आज या हिंदी दैनिकाचे प्रतिनिधी असलेले चंदन तिवारी पत्थलगुड्डा भागातील दूम्बी गावचे रहिवाशी होते.पत्थलगुड्डा भागाचे आजचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते.कामगारे नेते रघुवीर तिवारी यांचे चिरंजीव असलेल्या तिवारी याचं काल काही गुंडांनी अपहरण केलं होतं.त्यांना नजिकच्या जंगलात ठेवलं गेलं.पोलिसांनी शोध सुरू केला असता सिमरिया बत्थर भागात चंदन तिवारी जखमी अवस्थेत दिसले.त्यांना तातडीने नजिकच्या रूग्णालयात हलविण्यात आलं तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सिमरियाचे आमदार गणेश गंझू यांचा या हत्येमागे हात असल्याचा आरोप तिवारी कुटुंबानं केला आहे.अच्युतानंद साहू आणि चंदन तिवारी यांच्या हत्येचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती धिक्कार करीत आहे.
नक्षलवाद्यांची कार्यपद्धतीच निंदनीय आहे. दिवंगत वीर मरण पत्करलेल्या पत्रकारांना सदर अभिवादन. संघातीत गुन्हेगारी, हिंसाचार आणि आदिवासींचे शोषण करणारी विचारधारा ही मानवतेवर कलंक आहे. हा कलंक द३शच्य कपाळावरून लवकरात लवकर पुसला जावो ही प्रार्थना. लोकशाहीने निर्माण केलेल्या रचनांचे संगोपन, संवर्धन करणे ह्याला short cut नाही. आपण सर्व पत्रकार, स्तंभलेखक यांनी ह्या विषयात लेखन व जागरण निष्ठेने करत राहणे हीच दिवंगत पत्रकारांना खरी श्रद्धांजली ठरेल.