दिवानखाण्यात बसून पत्रकारांना दोष देणं जेवढं सोपं असतं तेवढी पत्रकारिता करणं सोपं नसतं.प्रत्येक टप्प्यावर अनेक धोके असतात.त्यामुळं पत्रकारितेला सतीचं वाण म्हटलेलं आहे.हे सारं आज पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शनच्या पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनचा एक कॅमेरामन आणि दोन जवान शहिद झाले.अरणपूर जंगलात हा प्रकार घडला.मृत कॅमेरामनचे नाव अच्यूतनंद साहू असे असून तो दिल्लीचा आहे.साहू एफटीआयआय मधील प्रशिक्षित होते.त्यांच्या निधनाचं दुःख आहेच..मात्र संवेदनशील क्षेत्रात बातमीदारी करणार्‍या पत्रकारांनी आणि छायाचित्रकारांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.अशा ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची गरज आहे.मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने साहू यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here