उद्योगपतींनी केलेली देशाची लूट

0
1164

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 11 हजार कोटीची वीज बिलाची थकबाकी आहे असं सरकार सागत आहे.पण उद्योगपतींनी सरकारला आणि सरकारी बॅकांना किती चुना लावलाय बघा..7,100 कोटींचा चुना एकट्या विजय मल्ल्यानं लावलाय.तरीही हा पठ्‌ठ्या भानगडी करीत ललनांबरोबर मजा करीत उजळमाथ्यानं फिरत असतो.त्याचा मोबाईल बंद करा असं कोणी सांगत नाही.अदाणी उद्योगाला आता 6100कोटीचं कर्ज दिलं गेलंय.ते वसूल होईलच याची खात्री नाही.
गेल्या पाच वर्षात बॅकांनी उध्योगपतींना 2,36,000 कोटींची कर्जं दिलीत.त्यातील केवळ 30,590 कोटींचीच कर्ज वसूल झाली.म्हणजे उद्योगपतींंंंंंंंंंनी देशाला जवळपास 2 लाख कोटी रूपायांना गंडा घातलाय.
एवढंच नव्हे तर सेझच्या नावाखाली या गरीब शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल दरांनी या उद्योगपतींनी लाटल्या.रोजगार निर्मितीचं आमिष दाखविलं गेलं,मोठ्या गुतवणुकीच्या गप्पा मारल्या गेल्या,निर्यात वाढेलची भूरळ घातली गेली,आणि देशाची आर्थिक प्रघती साधेल असंही सांगितलं गेलं.मात्र यापैकी काहीच झालं नाही.मात्र 2007 ते 2013 या काळात या धनदांडग्यांनी 83,104 कोटींच्या करसवलती लाटून देशाची लूट केली.याबाबत साऱ्याची चिडीचूप आहे.शेतक़ऱ्यंासाठी काही करायचं म्हटलं की,अनेक बुध्दीवाद्याच्या पोटातले कावळे कावकाव करतात.अर्थात वर जी उदाहरणं दिलीत ते केवळ हिमनगाचं एक टोक आहे.उद्योगपतींनी जी देशाची लूट केलीय तो आकडा यापेक्षा किती तरी मोठा आहे.रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅकांनी उद्योगपतींची एवढी कर्ज माफ केलीत की,त्या बदल्यात देशातील 15 लाख मुलांचे पदव्युत्तर शिक्षण देखील मोफत देता आले असते.आता बोला..खडसे साहेब या साऱ्याचं काय करायचं.शेतकरी तरी खऱचं ऐपत नाही म्हणूज वीज बिल भरत नाहीत.उद्योगपतीनी तर ठरवून बॅकांना आणि सरकारला चुना लावलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here