उद्याचा बातमीदारचा आज वर्धापन दिन

0
1199

3 वर्षे, 1036 पोस्ट आणि 25,008 व्हिजिटर्स. हा लेखाजोखा आहे माझ्या ब्लॉगचा.महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले वाढले होते.पत्रकार रोज अनेक प्रश्नांशी झगडत होते.ज्याच्या हातात माध्यमं आहेत,जी मंडळी जगभराचे प्रश्न मांडत होती,त्यांचे आपल्याच प्रश्नांकडं दुर्लक्ष होत होतं.पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्याही बातम्या येत नव्हत्या आणि आपले प्रश्न मांडायलाही पत्रकारांना लाज वाटत होती.पत्रकारांचे प्रश्न माध्यमातून मांडलेच जात नसल्यानं पत्रकारांचेही काही प्रश्न असू शकतात किंवा आहेत  हे समाजाला माहितच होत नव्हतं.राज्यात अनेक ठिकाणी पत्रकारांवर हल्ले व्हायचे त्याच्या बातम्या येत नसल्यानं कुठे हल्ला झाला,कोणी केला,त्याचं कारण काय हे ही ज गाला  कळायचं नाही.त्यातून मग पत्रकारांबद्दलच अनेक समज गैरसमज पसरायचे.ज्याच्यावर वेळ आली तो बिचारा पत्रकार व्यक्तिगत पातळीवर एकाकी लढत राहायचा.े.ही सारी परिस्थिती पाहून मन अस्वस्थ व्हायचे.मी तीस वर्षेपत्रकारितेत आहे.एका खेड्यातील वार्ताहरापासून ते संपादकांपर्यतच्या सर्व पातळ्यावर मी काम केलेले आहे.त्यातील 23 वर्षे मी संपादक राहिलो आहे.त्यामुळं पत्रकारांचे प्रश्न ,त्याच्या समस्यांशी मी चांगला परिचिच आहेे . अनेकदा मी ही त्यातून गेलो आहे. छत्रकारितेतील भ्रम आणि वास्तव हे ही मला चांगल्या प्रकारे माहित असल्यानं पत्रकारांचे प्रश्न घेऊनच आपण लढायचे असं मी ठरविलं आणि त्याचा एक भाग म्हणून 26- 02-2014 रोजी मी ( smdeshmukh.blogspot.in ) हा ब्लॉग सुरू केला.पत्रकारावरील हल्ले आणि पत्रकारांचे प्रश्न धाडसानं मांडण्याचा यापूर्वी असा प्रयत्न झालेला नव्हता.पत्रकारांना तत्वाचे डोस पाजणारे काही ब्लॉग होते (आणिआहेत)  पण हे ब्लॉगर पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल कधी बोलताना दिसले नाहीत.त्या अंगाने असा प्रयत्न प्रथमच होत होता.माझ्या या प़्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला.राज्यातील पत्रकारांनी आणि जगभरातील वाचकांनी ब्लॉगचं चांगलं स्वागत केलं.त्याची संख्या आज 25हजारचा आकडा पार करून गेली आहे.पत्रकारांनी ,वाचकांनी दाखविलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे कोणत्या शब्दात आभार मानावेत तेच कळत नाही.
ब्लॉग सुरू केला होता पण ब्लॉगच्या मर्यादाही जाणवत होत्या.त्यामुळं एखादी वेबसाईट असावी असा विचार समोर आला.उद्याचा बातमीदार नावाच्या एका साप्ताहिकाचं रजिस्ट्रशन माझी पत्नी शोभना हिनं केलेलं होतं.त्याच नावाचा मुद्रित अंक आणि वेबसाईटही सुरू करावी अशी कल्पना समोर आली आणि दोन्ही गोष्टी सुरू केल्या.उद्याचा बातमीदारला आज बरोबर एक वर्षेपूर्ण होत आहे.7 फेबु्रवारी माझा मुलगा सुधांशूचा वाढदिवस ्‌ असतो त्याच दिवशी गेल्या वर्षी वेबसाईट लॉच केली.एक वर्षेचालविल्यानंतर आज तिचा लुक बदलत नव्या रंगात नव्या ढंगात उद्याचा बातमीदार ( वेबसाईटचा पत्ताही बदलला आहे,तो कृपया वाचकांनी लक्षात ठेवावा तो असा www.batmidar.inअसा आहे ) लोकांसमोर येत आहे.लूक बदलला,आणि पत्ताही बदलला असला तरी बाणा मात्र कायम आहे.पत्रकारांचे प्रश्न बातमीदार त्याच धडाडीनं  त्याच धाडसाने आणि  कोणालाही भीक न घालता किंवा कोणासमोर लाचार न होता यापुढंही मांडत राहणार आहे.
मुद्रित स्वरूपातील साप्ताहिक जवळपास सहा महिने चालविले.पत्रकारांचे प्रश्न घेऊनच हे साप्ताहिक सुरू होते तरी आर्थिक काऱणांनी ते चालवता आलं नाही.आता ते बंद पडले आहे.मुंबईत बसून अनेकजण साप्ताह्किवाल्यांना लंगोटी पेपर किंवा चिटोरी पेपर म्हणून हिणवत असतात पण साप्ताहिक काढणं आणि ते चालवणं किती अवघड आङे याचा मी अनुभव घेतला आहे.
आज साप्ताहिक बंद असले तरी बातमीदार ही वेबसाईट आणि माझा ब्लॉग सुरू आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात पत्रकारितेच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडीची माहिती देण्याचे तसेच महाराष्ट्रात  पत्रकाारांवर होणाऱ्या  अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्याचं काम माझ्या हातातील ही दोन्ही माध्यमं करीत आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती किंवा मराठी पत्रकार परिषदच्या बातम्याचं व्यासपीठ म्हणूनच आज महाराष्ट्रत उद्याचा बातमीदारकडं पाहिलं जातं.दररोज शेकडो पत्रकार उद्याचा बातमीदारला भेट देत असतात.पत्रकारांमधील दोषांपेक्षा पत्रकारांच्या गुणांची कदर करणारा आणि पत्रकारांबद्दल समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा हा बातमीदारचा उद्देश आहे.पत्रकारांनीच आपल्या मित्रांचे कपडे काढून त्याला नागडे करावे आणि समाजातही त्यामुळं पत्रकारांबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा असा उद्योग बातमीदार करीत नाही ,करणार नाही.
उद्याचा बातमीदार असेल किंवा ब्लॉग असेल हे चालविणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग .यातून दोन पैश्यांचाही लाभ नाही तरीही आपण जो पत्रकारितेचा धर्म गेली तीस वर्षे पाळला,जे भोग आपल्या वाट्याला आले ते भोग

छत्रकारितेत येणाऱ्या तरूण पत्रकारांच्या वाट्याला येता कामा नयेत आणि पत्रकारांचेही काही प्रश्न आहेत आणि त्याकडे शासनाने आणि समाजानंही सहाऩुभूतीनं पाहिलं पाहिजे असं आम्हाला वाटत असल्यानंच या लष्कराच्या भाकऱ्या आनंदानं भाजण्याचं काम आम्ही करीत आहोत.अपेक्षा एकच आहे,याकार्यात आपल्या सर्वांची मदत मला अपेक्षित आहे.महिन्यातून दोन बातम्या जरी पत्रकारांनी पत्रकारांबद्लच्या छापल्या किंवा एक दिवस जरी पत्रकार संघटनेच्या कामासाठी दिली तरी मी जे काम एक मिशन म्हणून हाती घेतले आहे ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.कृपया मला,उद्यााचा बातमीदार आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला आपली साथ असू द्यावी एवढीच विनंती आणि अपेक्षा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here