आभारी आहोत

0
851

 उद्याचा बातमीदारला भेट देणार्‍या वाचकांची संख्या आता चार लाखावर पोहोचली आहे.बातमीदार नवीन स्वरूपात 10 फेबु्रवारी 2014 ला सुरू झाला.म्हणजे जेमतेम दीड वर्षे लोटली असतील.या कालावधीत चार लाख वाचकांनी पोर्टलला भेट दिली आहे.म्हणजे दरमहा जवळपास 22500 आणि दररोज सरासरी 750 वाचकांनी बेवसाईटला भेट दिली आहे.एका विशिष्ट विषयाला वाहिलेली वेबसाईट असताना,आणि कोणत्याही सणसणाटी किंवा खमंग बातम्या नसताना एवढ्या वाचकांनी न विसरता बातमीदारला रोज भेट द्यावी ही घटना बातमीदार टीमचा उत्साह वाढविणारी आहे.बातमीदारवर प्रामुख्यानं पत्रकारांचे प्रश्‍न,पत्रकारितेत घडत असलेल्या महत्वाच्या घटना आणि पत्रकाराच्या हक्कासाठी महाराष्ट्रात आणि देशभर सुरू असलेल्या चळवळीची माहिती दिलेली असते.या माहितीची मांडणीही संयत भाषेत केलेली असते.दररोज वाचक एवढ्या मोठ्या प्रमाणात वेबसाईटला भेट देतात याचा अर्थ आमचा प्रयत्न वाचकांना आवडतो आहे.वाचकांनी दाखविलेला हा विश्‍वास आणि वाचकांचं प्रेम याबळावर बातमीदार यापुढंही चळवळीचं व्यासपीठ म्हणून आपली भूमिका बजावत राहणार आहे. अन हो,बातमीदारबद्दल आपल्या काही सूचना असतील तर त्याचंही स्वागत प्रतिसादाबद्दल आम्ही वाचकांचे आभारी आहोत. आपण बातमीदारला भेट दिली नसेल तर लगेच खालील लिंकवर क्लीक करा.http://www.batmidar.in/ .टीम बातमीदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here