पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची साथ राज्यात पसरली आहे.गेल्या तीन दिवसांत पाच पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत.आज आणखी यवतमाळ जिल्हयातील एक प्रकरण समोर आलंय,पुसद येथील मांगीलाल चव्हाण संस्थेनं पाणलोट क्षेत्रातील बोगस कामांच्या बाबतीत देशोन्नतीत सातत्यानं बातम्या आल्याने संतापलेल्या संस्थाचालकानं देशोन्नतीचे पुसद येथील प्रतिनिधी दीपक हरिमकर यांच्या विरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यात भादवी 385,501 अन्वये खंडणीचा आणि बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनीही कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करून घेतला आहे.रविवारी नागपुरात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत तेव्हा या विरोधात परिणामकारक पाऊले उचलण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडं कऱणार आहोत.–