मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 

यंदा 19,20 ऑगस्ट रोजी शेगावला ,मुख्यमंत्री येणार 

नागपूर दि २६ ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषदेचे 41 वे व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशय येत्या 19 आणि 20 ऑगस्ट 2017 रोजी श्रीक्षेत्र शेगाव येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्धघाटन करण्यात येणार असून काल नागपूर येथे  परिषदेच्या अधिवेशनाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी  स्वीकारले आहे.समारोपासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मराठी पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा काल नागपूर येथील महर्षि व्यास सभागृहात झाली.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख या सभेच्या अध्यस्थानी होते. अमरावती विभागीय सचिव राजेद्र काळे यांनी यंदाचे परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन शेगावला आयोजित करावे अशी विनंती परिषदेकडे केली.परिषदेने ती एकमुखानं मान्य केली असून येत्या 19 आणि 20 जून रोजी हे अधिवेशन शेगाव येथे संपन्न होत आहे.या अधिवेशनात विविध विषयावर परिसंवाद होणार असून  अधिवेशनासाठी पी.साईनाथ,रजत शर्मा तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित कऱण्यात येणार आहे.नेहमीच्या प्रचलित विषयांना फाटे देत अधिवेशन जरा हटके पध्दतीचे व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

परिषदेचे हे 41 वे अधिवेशन असून यापुर्वी 2011 मध्ये अधिवेशन रोह्यात झाले होते,2013 मध्ये औरंगाबादला झाले आणि 2015 मध्ये पिंपरी-चिंचवड येथे अधिवेशन झाले होते.पिंपरी चिंचवडच्या अधिवेशनात दोन हजारांवर प्रतिनिधी उपस्थित होते.शेगाव अधिवेशनासाठी तीन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील असा अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.अधिवेशनच्या तयारीसाठी लवकरच शेगाव येथे बैठक घेतली जाणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

परिषदेच्या विस्ताराच्या आणि परिषद राज्यात तळागाळापर्यंत  पोहोचावी यासाठी एस.एम.देशमुख यांनी यावेळी विविध योजना जाहीर केल्या.त्यानुसार परिषदेच्या कार्याची माहिती अधिक पत्रकारांपर्यंत पोहोचावी आणि परिषदेवर कारण नसताना बिनबुडाचे आरोप करणार्‍या त्यांच्याच भाषेत उत्तर देता यावे यासाठी परिषदेचा एक सोशल मिडिया सेल स्थापन करण्यात येणार असून जिल्हा स्तरावर देखील प्रत्येक जिल्हयानं पाच पत्रकारांचा सोशल मिडिया सेल स्थापन करण्याच्या सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या आहेत.यापुढे परिषद सोशल मिडियाचा वापर अधिक प्रभावीपणे आणि आक्रमकपणे करणार आहे

या बैठकीस सर्वश्री विश्‍वस्त  किरण नाईक,कार्याध्यक्ष  सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विभागीय सचिव राजेंद्र काळे,हेमंत डोर्लिकर,अनिल महाजन,तसेच नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घुमटवार,कार्याध्यक्ष वराडे,सरचिटणीस योगेश कोरडे तसेच विविध जिल्हा संघांचे अध्यक्ष,परिषद प्रतिनिधी,आणि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here