आजपासून माथेरान महोत्सव

0
924

पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या माथेराम महोत्सवास आजपासून सुरूवात होत आहे.हा महोत्सव 26 मे पर्यत चालू राहणार असल्याची माहिती माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अजित सावंत यांनी सांगितले.विविध कार्यक्रम आणि स्पर्धांची या काळात रेलचेल असणार आहे.यामध्ये माथेरान आणि परिसरातील संस्कृतीचं दर्शन पर्यटकांना घडविले जाणार आहे.माथेरान निसर्ग चित्रांचं प्रदर्शन,छायाचित्रांचं प्रदर्शन पय्रटकांसाठी खाष आकर्षण ठरणार आहे.

आज सायंकाळी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकापासून शोभा यात्रा सुरू होईल.यामध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत.
21 मे रोजी माथेरानचा जन्मदिवस आहे त्या निमित्तानंही विविध कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले असून कवी अरूण म्हात्रे माथेरान अभिमान गीताचे सादरीकऱण करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here