अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणी आरोपींना 19 पर्यंत पोलीस कोठडी

पनवेलः पोलीस उपनिरिक्षक अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणातील आरोपी अभय कुरूंदकर आणि राजू पाटील या दोघांनाही आज पनवेलच्या सत्र न्यायालायाने 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यापुर्वी न्यायालयाने 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.त्याची मुदत आज संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर करम्यात आले होते.अभय कुरूंदकर आणि राजू पाटील हे दोघेही पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने या प्रकरणात अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस असे काही लागलेले नाही.ज्या दिवशी अश्‍विनी बिंद्रे बेपत्ता झाली त्या दिवशी बिंद्रेे आणि आरोपींच्या मोबाईल एकाच पोरिसरात लोकेट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.या प्रकरणाी आरोपींची नार्को टेस्ट करण्याची अनुमती मागितली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.पोलिसांनी आज आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली ती न्यायालाने मंजूर करून 19 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here