एसएमएस पाठविणारा जेरबंद

0
713

अलिबाग मधील प्रतिष्ठित महिलांना अश्लील एस.एम.एस.पाठवून त्यांना त्रास देणाऱ्या अभिराम हतुराम अतुलकर याला काल पोलिसांनी अटक केली आहे.तो अलिबागनजिकच्या थळ येथील आरसीएफ कंपनीत इंजिनिअर पदावर काम करीत आहे.

अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी काल दुपारी शहरातील महिलांना येत असलेल्या अश्लिल एसएमएसबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि सायंकाळी अतुलकरला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडे अश्लिल पत्र लिहिलेली डायरी,12 कोरी पोस्टकार्ड,आणि एक लिहिलेले अश्लिल पत्र सापडले असून पोलिसांनी त्याच्या विरोधात अश्लिल एसएंमएस पाठवून भावना दुखवणे आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे,तसेच सोशल मिडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्याला उशिरा न्यायालयात हजर केेले असता अतुलकरला 27 जून पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here