अलिबाग मुंबई , नवी मुंबईच्याच्या अधिक जवळ येणार

0
840

अलिबाग मुंबई  नवी मुंबईच्याच्या अधिक जवळ येणार

भाऊचा धक्का- मांडवा जलमार्गावर रो रो सेवा सुरू व्हावी हे अलिबागकरांचे जुने स्वप्न आता प्रत्यक्षात येत असून या मार्गावर 2018 पर्यंत रो रो सेवा सुरू होणार असल्याने अलिबाग आणि संपूर्ण रायगडच्या विकासालाच वेग येणार आहे भाऊचा धक्का -. मांडवा- नेरूळ-असा रो रो सेवेचा मार्ग असून या प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन नुकतेच भाऊचा धक्का येथे मुख्यमंत्रे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं.हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास अलिबाग मुंबई अणि नवी मुंबईच्या च्या अधिक जवळ येणार आहे.सध्या गेटवे ते मांडवा मार्गावर जलवाहतूक सुरू असली तर ही केवळ प्रवासी सेवा असल्यानं गाड्यांची ने-आण करता येत नाही,शिवाय नव्या सेवेमुळं मुंबई आणि नवी मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

मांडवा-नेरूळ-भाऊचा धक्का हा प्रवास रस्ता मार्गे करण्यासाठी तीन तासाचा अवधी लागतो.मात्र नव्या जलमार्गाने हा प्रवास जेम- तेम तीस  मिनिटात होणार असल्याने वेळ आणि इंधनाची  बचत होणार आहे.तसेच पदूषण कमी होऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.रो रो सेवेमुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच कार आणि बस सारख्या मोठ्या गाडयांची वाहतूकही करणे शक्य होणार असल्याने रायगडच्या पर्यटनाला पुढील काळात वैभवाचे दिवस येणार आहेत हे नक्की.कोणत्याही परिस्थीतीत हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकल्पाबरोबरच एलिफंटा येथे वीजपुरवठा सुरू कऱण्यासाठी पाण्याखालूून केबल टाकण्यात येतील आणि देश-विदेशातील पर्यटकांना एलिफन्ंट केव्हजवर रात्री थांबण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्याने नतिकच्या काळात रायगडच्या पर्यटनासाठी सुगीचे दिवस येणार असे दिसते आहे.

शोभना देशमुख अलिबाग-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here