अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यामध्ये काल झालेल्या मारहाणीत दोन कैदी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अलिबाग येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.रवींद्र भगवान दास आणि इब्राहिम शरिफ अन्सारी अशी जखमी झालेलय कैद्यांची नावं आहेत. .हल्ला करणारे कैदी गंभीर गुन्हयातील आरोपी असून त्यांना आता तळोजा येथील तुरूंगात हलविण्यात आलंय. हल्लेखोर कैद्यांच्या विरोधात कारागृहाचे जेलर सचिन गोविंद गुरव यांनी मंगळवारी अलिबाग पोलिसात तक्रार दिली असून हल्ला करणाऱ्या 10 कैद्यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अलिबागच्या तुरूंगातील क्षमता केवळ 80 पुरूष कैदी आणि 2 स्त्री कैदी ठेवण्याची आहे मात्र येथे 155 पुरूष कैदी आणि 21 महिला कैद्यांना ठेवण्यात आल्याने कैद्यांमध्ये सातत्यानं वाद होतात असे समजते.