अलिबागेत मतदार जनजागृती रॅली

0
924

लोकसभा निवडणुकीत मुक्त आणि निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी सक्रीय व्हा असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे.
मतदानाची टक्के वाढविण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनं आज अलिबागेत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती.या रॅलीचा शुभारंभ भांगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या रॅलीत शहरातील विविध की्रडा संघटना,युवक पथके,कराटे पटू,स्केटिंगचे खेळाडू आमि विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होत.रॅलीत खिळाडू वृत्तीने निर्धाऱ करू यात,मतदानाने लोकशाही बळकट करू या,सुज्ञ मतदार,लोकशाहीचा आधार,लोकशाही वाचवा,मतदानाचा अधिकार बजवा अशा विविध घोषणा असलेले फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here