अलिबागेत पावणेतीन लाख मतदार

0
775

अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणुक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असून मतदान जास्तीत जास्त व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती अलिबागचे उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली.
क्षीरसागर म्हणाले,अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 75 हजार 827 मतदार असून त्यात 1 लाख 38 हजार 489 पुरूष तर 1 लाख 37 हजार 338 महिला मतदार आहेत.हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 68.36 टक्के एवढे आहे.मतदार संघात 365 मतदान केंद्रे असून मतदार संघातील 96.27 टक्के मतदारांना मतदार ओळखपत्र देण्यात आली आहेत अशी माहितीही क्षीरसागर यांनी दिली.निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मतदार संघातील 20 गुंडांवर तडीपारीची कारवाई कऱण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here