अलिबागेत तीन मजली इमारत खचली

0
797

रायगड जिल्हयात गेली चार दिवस कोसळत असलेल्या पावसाने अलिबागमधील शास्त्रीनगर भागात असलेली एक तीन मजली इमारत खचली असून शहरातील अन्य १७ इमारती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.१७ पैकी १४ इमारतीमधील नागरिकांना नोटिसा देण्यात आल्याअसून त्यांना आपल्या इमारती रिक्त कऱण्यास सांगण्यात आले आहे.यातील ७२ रहिवाश्यांची व्यवस्था नगरपालिकेच्या शाळेत कऱण्यात आली आहे.उरण येथील देखील काही इमारती खचल्याचे समजते.
सततच्या पावसाने काल रात्री म्हसळा-माणगाव मागार्वरील घोणसे घाटात एक दरड कोसळली असून त्याचा राडारोडा रस्त्यावर आल्याने या मागार्वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दरम्यान सलग चौथ्या दिवशी आज रायगडमध्ये संततधार सुरू असून जिल्हयातील सवर्च नद्या दुथडी भरून वाहात आहेत.येत्या २४ तासात मुसळधारवृष्टी होण्याची शक्यता असल्याने दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या तसेच नदी आणि खाडी काठच्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here