अश्लिल एसएमएसचा धुमाकुळ

0
658

अत्यंत अश्लिल आणि देशातील काही नेत्यांची बदनामी करणारे एसएमएस गेली चार-पाच दिवस अलिबागमधील मान्यवर नागरिक तसेच वकिल,डॉक्टर्स आणि पत्रकारांना येत असल्याने अलिबागकर त्रस्त झाले आहेत.या ंसंदर्भात नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी आज अलिबागच्या पोलिस उपाधिक्षकांची भेट घेऊन एसएमएसबाबतच्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घातल्या,तसेच त्यानी अलिबागच्या पोलिस ठाण्यात देखील याबाबतची रितसर तक्रार दाखल केली असून या एसएमएस प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.नगराध्यक्षांनीच पुढाकार घेतल्याने शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनीही देखील आपली गा़ऱ्हाणी सायबर सेल कडे नोंदविली आहेत.पोलिसांनी आता असे अश्लिल एसएमएस पाठविणा़ऱ्याांचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here