अलिबाग बस स्थानकानजिक असलेले मस्त्यव्यवसाय विभागाचे कार्यालय शुक्रवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.रात्री एक वाजता लागलेल्या आगीचे तांडव पहाटे तीन वाजेपर्यत सुरू होते.आरसीएफच्या अग्निशमन दलाने नंतर आग आटोक्यात आणली.या आगीत कार्यालयातील जुनी महत्वाची कागदपत्र जळून खाक झालीत.आठ-दहा कॉम्प्युटर ,फर्निचर तसेच अन्य महत्वाची कागदपत्र जळाळी आहेत.मस्त्य व्यवसाय सोसायट्याच्या कर्जाची कागदपत्रे जळून खाक झालीत.अलिबाग परिसरातील अनेक मच्छिमार साोसायट्यातील भ्रष्टाचार मधल्या काळात उघडकीस आला होता.याबाबतची कागदपत्रही आगीत भस्मसात झालीत काय या बाबत लगेच माहिती मिळू शकली नाही.आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

LEAVE A REPLY