अमिरखान कोण आहे?

0
809

एक चांगला अभिनेता ही अमिर खानची ओळख आहे.आपण सामाजिक बाधिलकी जपणारे अभिनेते आहोत असा आभास तो टीव्हीवरील कार्यक्रमातुन,आपल्या चित्रपटातून करीत असतो.मात्र कधी त्याला देश सोडून जाण्याची लहर येते तर कधी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून जससंधारणाचे महत्व पटवून सांगावे वाटते .नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे हे लोकप्रिय अभिनेते देखील दुष्काळग्रस्त बांधवांचे अश्रू पुसण्याचं काम करीत आहेत.मात्र अमिर खान आणि त्यांच्यात फरक असा की,नाना,मकरंद थेट लोकामध्ये जाऊन हे काम करतात तर अमिर खान लोकांपासून चार हात दूर असतो.परवा अमिरखान अंबाजोगाईला गेला तिथंही त्यांनी लोकांपासून अंतरच ठेवलं.आज तर सातार्‍यात अमिरखाननं आणि पोलिसांनी कमालच केली.अमिर खान यांच्यासाठी एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली होती की,अमिर खान समाजसेवक आहे की,एखादा डॉन हे समजत नव्हतं.जिथं अमिर खान आणि स्वाधिन क्षेत्रीय यांची बैठक होती तो सारा परिसर पोलिसांनी व्यापला होता.सामांन्य लोकांचं सोडाच पण पत्रकारांनाही आत प्रवेश नव्हता.बैठक जलशिवारबाबत असेल तर तिथं पत्रकारांना बंदी घाळण्याचं काहीच कारण नव्हतं.मात्र पोलिसांनी पत्रकारांना अडविलं.केवळ अडविलंच असं नाही तर अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली गेली.सातारा जिल्हा पत्रकार संघानं या घटनेचा ऩिषेध केला आहे.ज्याना समाजासाठी काही करायचं असतं त्यांनी असं कडेकोड पोलिसांच्या बंदोबस्तात जगायचं नसतं.अमिर खान आणि पोलिसांना एवढीच भिती वाटत असेल तर अमिरनं खुषाल घरी बसावं त्याच्यावाचून जलशिवारचं आणि दुष्काळग्रस्ताचं काहीच अडणार नाही.त्यासाठी नाम आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here