पुणेः महाराष्ट्रातील पत्रकारांना आता खरोखरच चांगले दिवस येऊ घातले आहेत असं म्हणावं लागेल.कारण पत्रकारांची सर्वात मोठी गरज आरोग्य विषयक होती.एखादा पत्रकार आजारी पडला तर पत्रकारांना आपसात निधी जमा करून संबंधित पत्रकारांवर उपचार करावे लागायचे.आता पत्रकारांची काळजी घेण्यासाठी एका पाठोपाठ एक महापालिका समोर येत आहेत.ही आनंदाची,स्वागतार्ह आणि अभिनंदनीय बाब आहे.अगोदर मुंबई ,ठाणे महापालिकेने पत्रकार आरोग्य निधीची व्यवस्था केली.त्यानंतर कल्याण -डोंबिवली महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 50 लाख रूपयांची तरतूद केली,नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकांनीही तसा प्रस्ताव दिलेला आहे.आता अकोला महापालिकेनेही पत्रकारांसाठी 30 लाख रूपयांची तरतूद करून शहरातील पत्रकारांना मोठाच दिलासा दिला आहे.अकोला शहरातील तीनशेवर पत्रकारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या सर्व महापालिकांचे मराठी पत्रकार परिषद आभारी आहे.राज्यातील अन्य महापालिकेतही पत्रकारांसाठी राखीव निधी ठेवला जावा यासाठी परिषदेच्या स्थानिक शाखांनी तातडीने मनपाशी संपर्क साधून पत्रकार आरोग्य निधीसाठी तरतूद करण्याचे पत्र द्यावे अशा सूचना एस.एम.देशमुख यांनी जिल्हा संघांना केल्या आहेत.

अकोला महानगर पालिका ने सन 2018 – 19 च्या अंदाजपत्रकात पत्रकार सहाय्यता निधी म्हणून 30 लाख रु ची तरतूद केल्याबद्दल अकोला महानगर पालिका पदाधिकारी , मनपा चे सर्व नगर सेवक , मनपा आयुक्त जितेंद्र वाघ या सर्वांचे अकोला जिल्हा पत्रकार संघातर्फे मनःपूर्वक आभारी आहोत , पत्रकारासाठी सहाय्यता निधी ची बजेट मध्ये तरतूद करणारी अकोला मनपा ही महाराष्ट्रातील चौथी  मनपा ठरलेली आहे , या पूर्वी ठाणे , कल्याण डोंबिवली मनपा ने पत्रकार सहाय्यता निधी साठी 50 लाख रु व नवी मुंबई मनपा ने 1 कोटी रु ची तरतूद बजेट मध्ये केलेली आहे , पत्रकाराना आजारपणात व अपघातात जखमी अवस्थेत आर्थिक मदत म्हणून या निधीतुन मनपा सहाय्यता करणार आहे , या मुळे आजार पीडित व अपघातग्रस्त पत्रकाराना मदत उपलब्ध होणार आहे पत्रकाराना आजारपणात व अपघात ग्रस्त अवस्थेत मदत मिळावी म्हणून पत्रकारांची शीर्ष संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई ने असा प्रस्ताव राज्यातील 36 जिल्हा पत्रकार संघा तर्फे संबंधित महानगर पालिका व नगर पालिका यांना दिले होते , त्यामध्ये सर्वात प्रथम कल्याण डोंबिवली मनपा ने बजेट मध्ये असा ठराव पारित करून राज्यात नाव लौकिक केला नंतर नवी मुंबई मनपा ने व आता आमच्या अकोला मनपा ने ही त्यामध्ये सहभागी होऊन प्रशंसनीय कार्य केले आहे , या मागणी करिता पत्रकारांचे झुंझार नेते एस एम देशमुख , म प परिषदेचे विश्वस्त किरण नाईक , म प परिषद चे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा ,सरचिटणीस अनिल महाजन , कार्याध्यक्ष गजानन नाईक यांचे मार्गदर्शन व त्या त्या जिल्हा पत्रकार संघाचा पुढाकार महत्वाचा ठरलेला आहे , पत्रकारांच्या करिता संरक्षण कायदा , पत्रकाराना पेंशन व आता मनपा ,न पा सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था कडून पत्रकाराना सहाय्यता निधी ची सुरवात अशा महत्वपूर्ण उपलब्धी करून देत असल्याबद्दल म प परिषदेचे नेते एस एम देशमुख , किरण नाईक व परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा व परिषदेच्या सर्व पदाधिकाऱयां चे व मनपा चे महापौर , उपमहापौर , मनपा आयुक्त , स्थायी समिती व सर्व मनपा नगर सेवकां चे  – – – शौ.मिरसाहेब , अध्यक्ष , प्रमोद लाजूरकर सरचिटणीस , संजय खांडेकर सह चिटणीस व सर्व पदाधिकारी , अकोला जिल्हा पत्रकार संघ यांनी आभार मानले आहेत . 

LEAVE A REPLY