रायगड जिल्हयाला आज तिसऱ्या दिवशीही पावसाने झोडपून काढले.सलगच्या जारदार पावसाने जिल्हयातील प्रमुख नद्यांना पूर आले असून अंबा नदीचे पाणी नागोठण्यात घुसले आहे.नागोठण्यातील बस स्टॅन्ड,कोळी वाडा,भाडी मंडई परिसर पाण्याखाली गेला आहे.पालीचा नागोठण्याला जोडणारा पुलही पाण्याखाली आहे.पाताळगंगा नदीही दुथडी भरून वाहत असून पाताळगंगंचं पाणी रसायनी परिसरात पसरलं आहे.रोह्यात कुलंडलिका नदीही दुथडी भरून वहात आहे.सावित्री नदीही भरून वहात आहे.पावसामुळे जिल्हायीतील २८ पैकी १७ धरणं तुंडुंब भरली असून अन्य धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे.पुरेशा पावसामुळे जिल्हयातील भात पिकाच्या लावणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आगामी ७२ तासात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर आज एक पयर्र्टक वाहून गेला.त्याचा मृतदेह हाती लागला आहे.