अलिबाग- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांचे पार्थिव काल रात्री त्यांच्या आंबेत या गावी आणले असून आज दुपारी 1 वाजता आंबेत येथे पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अत्यविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केदर्ंीय मंत्री अनंत गीते,विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख,राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,कॉघ्रेसचे नेते नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.
काल रात्री उशिरा अतुले यांचे पार्थिव आंबेत येथे आणण्यात आले.ते पाहून गावकऱ्यांना शोक अनावर झाला.आज दुपारपर्यत त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी त्यांच्या नर्गिस विला या त्यांच्या बंगल्यात ठेवण्यात आले आहे.
सोनिया गांधी,राहूल गांधी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.