Thanx अलिबाग…

अलिबाग.. नितांत सुंदर, शांत अाणि सुसंस्कृत असं गाव.. आपल्याच धुंदीत जगणारं.. कायम हवं हवंसं वाटणारं.. आज अलिबाग रस्ता, समुद्र मार्गे जगाशी जोडलं गेलं असलं आ़णि अलिबाग हे विकासाचं केंद़ होत असलं तरी कधी काळी अलिबाग या सर्वांपासून अनंत अतर दूर होतं.. खरं सांगू? 1994 च्या सप्टेंबर मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा अलिबागला गेलो होतो तेव्हा मी अलिबागला घाबरलो होतो.. संध्याकाळी सातची कोल्हापूर गाडी गेली की, जवळपास बाह्य जगापासून अलिबागचा संपर्क तुटायचा.. शहर ही सात वाजता गडीगुप..आठ वाजता पानं लावून आम्हीही ऑफिस बाहेर पडायचो.. नंतर करायचं काय हा प्रश्न सतावत असे. .. समुद्रावर जाऊन लाटांचा आवाज एेकत बसायचो.. पण तो देखील भेसूर वाटायचा.. सुरूवातीला अगदी पावसाची देखील भिती वाटायची.. मी महानगरात वावरेलेलो.. त्या तुलनेत अलिबाग खेडं वाटायचं.. त्यामुळं अलिबागला दम घुटायचा.. आपला इथं निभाव लागणं शक्य नाही असं मन सांगायचं आणि मग अधिकच उदास व्हायला व्हायचं..अनेकांनी असं भाकित वर्तवलं होतं की, तुम्ही जिथं कामाला जाणार आहात त्यांच्याशी तुमचं सहा महिने देखील पटणार नाही… परत याल.. मी विचार करायचो, परत जायचंच आहे तर फॅमिली तरी कश्याला आणा? अनुभव घेणं सुरू असल्यानं किमान तीन महिने हॉटेलमध्येच राहत होतो.. परंतू ही उदासी, ही भिती फार काळ टिकली नाही.. अलिबाग नं मला आणि मी अलिबागला कधी आपलेसं केलं कळलंही नाही…जन्मानं नसलो तरी मनानं मी अलिबागकर झालो होतो.. वर्ष, दोन वर्षे, दहा वर्षे करीत करीत अठरा वर्षे मी अलिबागकर होतो.. माझा सारा उमेदीचा काळ अलिबागमध्ये गेला.. आर्थिकदृष्ट्या मी अलिबागमध्ये स्थिरावलो आणि मानसिकदृष्ट्या मी अलिबागच्या प्रेमात पडलो.. झपाटल्या सारखं काम केलं.. रायगडच्या भूमीपूत्रांचे प्रश्न माझे व्यक्तीगत प्ंशन असल्यासारखं मी त्यावर तुटून पडायचो.. रेवस – मांडवा विमानतळ विरोधी लढा असो, सेझ विरोधी संघर्ष असो, जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचे प्ंशन असोत किंवा मुंबई – गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा विषय असो लेखणी बरोबरच थेट रस्त्यावर उतरून या सर्व पंशनांना भिडत राहायचो.. हा हल्लाबोल करताना कधी कोणाची भिती वाटली नाही, कुणाला कधी भिक ही घातली नाही…कारण रायगडची सामांन्य जनता कायम माझ्या बरोबर होती.. रायगडचे पत्रकार माझ्याबरोबर होते..मी रायगडच्या पत्रकारांचा कायम श्रुणी यासाठी आहे की, त्यांनी अठरा वर्षे मला सांभाळलं आणि रायगड सोडल्यानंतर देखील कायम मला खंबीर साथ दिली.. माझ्या सुखाद आणि माझ्या दुख:त देखील ही सारी मुलं माझ्या पाठिशी ऊभी राहिली….आज पत्रकारांची जी राज्यव्यापी चळवळ उभी राहिली आहे त्याचं बिजारोपण देखील अलिबाग आणि रायगडमध्ये झालं.. रायगडला मुळातच चळवळीचा वारसा आहे, जगातील शेतकरयांचा पहिला संप ही अलिबाग नजिक चरी येथेच झाला.. चळवळींना बळ देणारी ही भूमी आहे.. चळवळ्या माणसांना ती गप्प बसू देत नाही.. अलिबागला मी रमलो त्यामागं ही चळवळीची पार्श्वभूमी आहे.. असं नाही की, अलिबागला मला काही वाईट अनुभव आलेच नाहीत .. मला आयुष्यातून उठवायचे जसे प़यत्न झाले तद्वतच माझ्या घरावर सशस्त्र हल्ला करण्याचाही प़यत्न झाला..पण प़त्येक वेळी ताऊन सुलाखून निघालो आणि मी कोणाला घाबरलो ही नाही.. बेडरपणे आलेल्या प्ंसंगाला सामोरं गेलो.. अलिबागवासियांनी जे प्रेम मला दिलं, जो आपलेपणा दिला त्यापुढे अशा घटना क्षुल्लक होत्या..खरं म्हणजे मी अलिबागला गेलो तेव्हा कोकणी आणि घाटी हे स्पिरिट जोरात होतं.. पण मी घाटी असल्यानं कोणी तरी माझा द्वेष करतंय, कोणी तरी मला डावलतंय किंवा मला सापत्न वागणूक दिली जातेय असं कधी मला वाटलं नाही.. उलट मी ज्या तडफेनं आणि तळमळीने रायगडचे प़श्न मांडायचो ते पाहून अनेकांना वाटायचं हा रायगडचाच.. मला आठवतंय, पुर्वी अनेक सिनेमात, नाटकात “अलिबाग से आया है क्या”? असे संवाद असतं.. यामागं अलिबागकरांना गावढळ, अडाणी ठरविण्याचा प़यत्न असायचा.. मला हे यासाठी खटकायचं की, अलिबागकर असे नाहीत.. सुशिक्षित, सुसंस्कृत, कर्तृत्ववान लोकांची ही भूमी आहे..मात्र निर्माते अलिबाग करांची चुकीची प्ंतिमा तयार करीत होते. .. त्या विरोधात मी “हां मै अलिबाग से ही आया हू” असा लेख लिहून अलिबागकरांच्या कर्तृत्वाचे अनेक दाखले दिले.. सर्वच निर्मात्यांना हा संदेश,, इशारा होता.. नंतर नमिता नाईक आणि सामाजिक संस्थांनी हा विषय लावून धरला.. आज अलिबाग से आया क्या अपमानास्पद शेरेबाजी बंद झाली आहे.. अलिबागच्या अशा अनेक आठवणी आहेत.. त्या मी विस्तारानं कधी तरी लिहिणार आहे..आज मी अलिबागला नसलो तरी अलिबागचं आकर्षण, अलिबागचं आपलेपण जराही कमी झालं नाही..जेव्हा केव्हा अलिबागचं निमंत्रण येतं तेव्हा मी हातची कामं सोडून अलिबागला जातोच जातो.. कारण मी आज जे काही आहे ती सारी अलिबागची देण आहे.. अलिबाग नं मला भरभरून दिलं…म्हणूनच माझ्या आयुष्यातील 18 वर्षे खरया अर्थानं अविस्मरणीय ठरली.. थँक्यू अलिबाग, थँक्यू रायगड..एका कार्यक्रमासाठी उद्या रविवारी अलिबागला आहे.. त्यानिमित्तानं हे सारं आठवलं.. उद्या सारे जुने मित्र भेटणार आहेत, गप्पा होणार आहेत.. पण हे सारं करताना काळजी ही घेणार आहे..एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here