SM यांचा सांगलीत सत्कार

0
694

पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी प़ेस कौन्सिलची परवानगी घेणे बंधनकारक करावे
एसेम देशमुख यांची मागणी

सांगली : पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतर राज्यातील पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाली असली तरी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत ही चिंतेची बाब आहे.. खोटे गुन्हे दाखल झाल्याने पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी थांबविण्यासाठी पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता घेणे बंधनकारक करावे अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी एस.एम.देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि कायदा करायला सरकारला भाग पाडले.. त्याबद्दल सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचयावतीने एस.एम.देशमुख यांचा नुकताच लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते..
आपल्या भाषणात देशमुख म्हणाले, पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मंजुरी घेतली जावी अशी सूचना प़ेस कौन्सिलचे चेअरमन यांनीच स्वतः केली आहे.. ती योग्य असल्याने सरकारने त्याचा विचार करावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे..
राज्यात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होण्यापूर्वी दर चार दिवसाला एका पत्रकारावर हलला होत होता.. कायदा संमत झाल्यानंतर त्यात घट झाली असून लोकांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.. मात्र पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने यावर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले..
राज्य सरकारने पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली असली तरी त्याचा लाभ ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळताना दिसत नाही अशा स्थितीत या योजनेतील जाचक अटी शिथिल करून या योजनेची व्याप्ती वाढविली पाहिजे असे मत एस एम यांनी व्यक्त केले..
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने केलेल्या सामाजिक कार्याची प़शंसा करतानाच देशमुख यांनी पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत विधायक पत्रकारिता केली पाहिजे असे मत व्यक्त केले.. सामाजिक बांधिलकी हा पत्रकारितेचा आत्मा असल्याने लेखणीच्या माध्यमातून समाजाचे प़शन सुटत नसतील तर पत्रकारांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकारांनी दिलेल्या प़दीर्घ लढ्याचे उदाहरण त्यांनी याअनुषंगाने दिले..
वसंतराव भोसले यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या हक्कासाठी देशमुख करीत असलेल्या संघर्षाची प़शंसा केली.. आपल्या हक्कासाठी पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले..
प्रारंभी परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर. यांनी प़ास्ताविक केले.. यावेळी मंचावर जालंधर हुलवान, पत्रकार शोभना देशमुख उपस्थित होते..जिल्हयातून मोठ्या संख्येने पत्रकार कार्यक़मास उपस्थित होते.. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही पत्रकारांचा यावेळी एस. एम. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here