प्रिन्ट मिडियात काम करणारया पत्रकारांसाठी आनंदाची बातमी आहे. इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि डिजिटल मिडियाने उभे केलेले आव्हान मोडीत काढत प्रिन्ट मिडियाची घोडदौड सुरूच आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये मुद्रित माध्यमांच्या वाचक संख्येत १ कोटी ८० लाखांनी वाढ झालाचं आढळून आलं आहे. विशेष म्हणजे जगभरातील अनेक नियतकालिकं बंद पडत असताना किंवा त्यांच्या वाचक संख्येत सातत्यानं घट होत असताना भारतात मात्र मुद्रित माध्यमांची वाचक संख्या वाढत आहे. भारतीय मुद्रित माध्यमांनी निमा॓ण केलेली विश्वासार्हता हेच याचे कारण असू शकते. टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतर आणि डिजिटल मिडियावर बातमी वाचल्यानंतरही ही बातमी मुद़ित माध्यमात आली का हे पाहण्याची वाचकांची उत्सुकता हे मुद़ित माध्यमाच्या यशाचं गमक अाहे.
याचा अर्थ पुढील ५० वर्षे तरी भारतात मुद्रित माध्यमाला मरण नाही.
इंडियन रिडरशीप सर्व्हे 2019 चा अहवाल नुकताच मिडिया रिसर्च यूझसॅ कौन्सिलने प़सिधद केला आहे. त्यानुसार 2017 मध्ये एकूण वाचक संख्या ४० कोटी ७० लाख होती. ती आज ४२ कोटी ५० लाख एवढी झाली आहे. म्हणजे एकूण वाचक संख्येत १ कोटी ८० लाखांची भर पडलेली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटलचया जिवघेण्या स्पर्धेत ही वाढ नक्कीच दिलासादायक आहे.
नियतकालिकांचया वाचक संख्येतही ७ कोटी ८० लाखांवरून ८ कोटी ७० लाख एवढी म्हणजे ९० लाखांची वाढ झाली आहे..
एकूण वाचक संख्येत हिंदी भाषिक वाचक संख्येत १ कोटींची वाढ झाली आहे. ती 18.6 कोटी झाली आहे. प्रादेशिक भाषेतील वाचक संख्या २१.१ कोटी आहे त्यामध्ये ०.८ ची भर पडली आहे. तर इंग्रजी वाचकांच्या संख्येत ०.३ ची वाढ झाली आहे.. महाराष्ट्रातील लोकमत, सकाळ, पुणनगरी आदि दैनिकांच्या वाचक संख्येत मोठी वाढ झाली आहे.
त्यामध्ये लोकमतची वाचक संख्या १ कोटी ९७ लाख, सकाळ १ कोटी १८ लाख, पुण्यनगरी ९७ लाख ७० हजार, पुढारी ८० लाख ८३ हजार, आणि लोकसत्ता ४१ लाख ७४ हजार एवढी झाली आहे.

1 COMMENT

  1. भारतात अंक वाढ होण्यामागे घरपोच सेवा (होम डिलव्हरी) हे एक महत्वाचे कारण आहे …
    त्यात आमच्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोलांचे योगदान आहे.
    गणेश वडगांवकर
    जिल्हा उपाध्यक्ष
    नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ नांदेड

LEAVE A REPLY