कायद्याचा धाक :पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनात लक्षणीय घट
एस. एम.देशमुख देशमुख यांनी व्यक्त केले समाधान

मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यानंतर राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून आले आहे.. २०१८ मध्ये ४२ पत्रकारांवर हल्ले झाले होते मात्र २०१९ मध्ये ही संख्या घटली असून हा आकडा २६ पर्यंत खाली आला आहे… २०१७ पुर्वी चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत होता हे प़माण आता पंधरा दिवसाला एक हल्ला एवढे कमी झाले आहे.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांवरील घटलेल्या हललयाबददल समाधान व्यक्त केले असून हा पत्रकार संरक्षण कायद्याचा परिणाम असल्याचे मत व्यक्त केले आहे.. ८ डिसेंबर २०१९ पासून हा कायदा राज्यात लागू झाल्याने पुढील काळात पत्रकारांवरील शारीरिक हल्ले पूर्णता बंद होतील असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे…पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प़सिध्दी पत्रकात पत्रकारांवरील हल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे…
२०१० ते २०१७ या काळात दरवर्षी ७० ते ८० पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. दरमाह पाच ते सहा पत्रकार हल्लेखोरांचे शिकार होत होते.. मात्र ७ एप्रिल २०१७ राजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पत्रकार संरक्षण कायदा संमत केला.. या कायद्यात पत्रकारावरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आल्याने हितसंबंधीयांचया मनात कायद्याची भिती निर्माण झाली.. परिणामतः हल्ले कमी झाले.. गेल्या १२ वर्षात २०१९ मध्ये पत्रकारांवर सर्वात कमी हल्ले झाले आहेत..
२०१९ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या ज्या प़मुख घटना समोर आल्या त्यामध्ये पालघर येथील सकाळचे प्रतिनिधी पी. एम. पाटील यांच्यावर वाहतूक पोलिसांनी केलेला हल्ला, सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर झालेला हल्ला, जिंतूर येथील पत्रकार प़वीण मुळे आणि प़शांत मुळे यांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा झालेला प्रयत्न, राहुरीतील पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर झालेला हल्ला, पुणे येथील जिब़ाण नाझीर यांच्यावरील हल्ला, होळीचे फोटो काढल्यामुळे परभणी जिल्ह्यातील आसोला येथील गोपीराज जावळे यांच्यावर केला गेलेला हल्ला, 24 मे रोजी मतमोजणी कक्षात शेकाप आमदार जयंत पाटील यांनी लोकसत्ताचे प़तिनिधीं हर्षद कशयाळकर यांच्यावर केलेला हल्ला, लोहा येथील पांडुरंग रहाटकर, विदर्भातील अजय अस्वले या पत्रकाराला बस कंडक्टरने केलेली मारहाण, सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील पत्रकार मुराद पटेल यांच्यावर कोयत्याने झालेला हल्ला आदि घटनांचा उल्लेख करता येईल..गेल्या दोन दिवसात नगरमधील विठ्ठल शिंदे यांना पोलिसांनी केलेली मारहाण, आणि पिंपरी येथील तेज रफ्तार चे संतलाला यादव यांच्या घरावर करण्यात आलेला हल्लयाने माध्यम क्षेत्रात संतापाची लाट पसरली.. ८ डिसेंबर नंतर वरील दोन घटना आणि जालणयातील एक घटना अशा तीन घटना घडल्याचे समोर आले आहे..
पत्रकारांवर ग्रामीण भागातच जास्त हल्ले होतात तो ट्रेन्ड २०१९ मध्येही बघायला मिळाला…
याशिवाय ठाण्यातील एक पत्रकार नित्यानंद पांडे यांची हत्या याच वर्षात झाल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या पत्रकात देण्यात आली आहे…
खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले
पत्रकार संरक्षण कायदा झाल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांचे प़माण कमी झाले असले तरी पत्रकारांवर खंडणी, शासकीय कामात अडथळे आदि स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे.. २०१८ मध्ये पत्रकारांवर अशा स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल केले गेले होते.. यावर्षी ही संख्या दोनने वाढली असून यंदा १४ पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत… यामध्ये प्रामुख्याने पाटोदा, माहूर, मंगरूळपीरमधील घटनांचा उल्लेख करता येईल..

जगभरातही पत्रकारांवरील हल्ले घटले
Reporters Without Border ही फ्रान्समधील संस्था पत्रकारांच्या हक्कासाठी आणि हितासाठी काम करते.. या संस्थेने प़सिध्द केलेल्या २०१९ च्या अहवालात पत्रकारांवरील हल्ले कमी झाल्याचे म्हटले आहे.. २०१९ मध्ये जगभरात ४९ पत्रकार मारले गेले.. गेल्या १६ वर्षांतला हा निचांक आहे… या घटना देखील अफगाणिस्तान, सीरिया, यमन आदि अशांत भागात घडल्याच संस्थेचं म्हणणं आहे.. मात्र विविध कारणांनी पत्रकारांना अटक करण्याच्या प़कारात तब्बल १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे असल्याचेही संस्थेने अहवालात नमूद केले आहे…

LEAVE A REPLY