माहिती, जनसंपर्क विभागातील
अधिकारयांचे इस्त्रायल दौरे ठाकरे सरकारच्या रडारवर
मुंबई : माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक आणि विभागाचे सचिव श्री. ब्रिजेशसिंग यांच्याकडून महासंचालक आणि सचिव पदाबरेबरच cyber cell पदाची देखील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.. त्यांची आय. जी. ट्रेनिंग या पदावर नियुक्तीवरून होणार असल्याचे समजते..
महासंचालक असताना ब्रिजेशसिंग यांच्या कार्यशैलीमुळे माहिती आणि जनसंपर्क विभाग च रस र्चेचा विषय ठरला.. पोलिस खाकयामुळे पत्रकार आणि या विभागाचा संपर्क ही तुटला होता.. त्यामुळे मिडियात ही नाराजी होती.. मध्यंतरी विभागातील काही अधिकारयांना इस्त्रायलचया दौरयावर पाठविण्यात आले होते.. मिडियातील आधुनिक तंत्राचा अभ्यास करायचा तर इंग्लंडला जायला हवे होते पण अधिकरयांना इस्त्रायल दौरयावर का पाठविले गेले याची चर्चा असून माहिती विभागातील अधिकारयांचे इस्त्रायल दौरे नव्या सरकारच्या रडारवर आहेत.. याची चौकशी होणार असल्याचे बोलले जाते..
दरम्यान बिजेशसिंग यांच्याकडील सर्व जबाबदारया त्वरित स्वीकाराव्यात असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कळविले आहे.. त्यानुसार दिलीप पांढरपट्टे सोमवारी महासंचालक, सचिव आणि सायबर सेलची जबाबदारी स्वीकारतील असे समजते.. बिजेशसिंग यांच्या बदलीमुळे माहिती विभागात आनंदाचे वातावरण आहे….