रेल्वेला अपघात, 18 ठार

0
1163

दिवा – सावंतवाडी पॅसेंजरचे इंजिनासह चार डबे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे- रोहा स्थानकादरम्यान भिसे खिंडीच्या बोगद्याजवळ घसरून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले आहेत.अपघातात 200च्या वर प्रवासी जखमी झाल्याचे प्रत्येक्षदर्शीनी सांगितले असले तरी आतापर्यत 50 जण जखमी झाल्याची पुष्टी मिळाली आहे.जखमींना रोहा आणि नागोठणा येथील रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.कुर्ल्याहून निघालेले मदत पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे 6 वाजून 20 मिनिटांनी दिवा -सावंतवाडी पॅसेंजर दिवा स्थानकातून निघाली.ती 9 वाजता रोहा स्थानकात पोहोचते पण आज गाडी अर्धातास लेट होती.नागोठणे स्थानक सोडल्यानंतर भिसे खिंडीतील बोगद्याजवळ अचानक इंजिनासह चार बोगी रूळावरून घसरल्या.सुट्याचा हंगाम असल्याने पॅसेंजर प्रवासांनी खचाखच भरलेली होती.रेल्वे रूळावरून घसरताच एकच कल्लोळ उडाला.मोठा आवाजही झाला त्यामुळे स्थानिक काही लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्यास सुरूवात केली.ही बातमी कळल्यानंतर कुर्ला येथूनही मदत पथक निघाले.पण पहिला जवळपास एक तास प्रवाशांना कोणतीच मदत मिळाली नाही.
या अपघातात 8 जण ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.मृतांचा आक़डा वाढण्याची शक्यता वर्तविली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here