मृतांची संख्या 20 , 148 जखमी 

0
728
रायगड जिल्हयातील नागोठणे -रोहा स्थानकाच्या दरम्यान आज सकाळी दिवा – सावंतवाडी प्रवासी रेल्वेला झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 20 वर पोहोचली असून 148 जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.जखमींवर रोहा,नागोठणे,अलिबाग येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत असून गंभीर जखमींना सायनला पाठविण्याता आले आहे.मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखाची , गंभीर जखमींना  50 हजारां आणि किरकोळ जखमींना 10 हजार रूपयांची मदत रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केली आहे.
आज दुपारी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील ,पालक मंत्री सुनील तटकरे यांनी घटनास्थळास तसेच रोहा येथील रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
अपघातामुळे  विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही.त्यामुळं नेत्रावती,मांडवी तसेच निजामुद्दीन या गाड्या मार्गावर अकडून पडल्या आहेत.मंगला एक्स्प्रेस आणि अन्य काही गाड्या रत्नागिरी-पुणे मार्गे वळविण्यात आल्या आङेत. या मार्गावरून दररोज 32 गाड्यांची ये-जा सुरू असते.
मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
रेल्वे अपघातातील मृतांची नावं 
भरत बळीराम सुर्वे (४९)
 कृष्णा तुकाराम सुर्वे (७०)
 सुरेखा जयराम नाकती (३५)
 विक्रांत बाळकृष्ण सुर्वे
 चिंटू गोसावी (२२)
 प्रदीप पारवे
 मिथिल जोशी
 कमलेश चव्हाण
 श्रद्धा कोकणे
रेल्वे अपघातातील जखमींची नावं

 वैभव विश्राम (३०) (संगमेश्वर)
 अंकिता महाडिक (२०) (माणगाव)
 प्रकाश महादेव पांरागे (५५) (वडाळा)
 रिमा दिलीप राणे (३३) (राजापूर)
 उल्हास शंकर कडवेकर (३८) (संगमेश्वर)
 उत्तरशा उल्हास कडवेकर (संगमेश्वर)
 रविंद्र सीताराम सावंत (५०)
 दीपक जगीभार (३५) (संगमेश्वर)
 हेमंत पांडे
 जगन्नाथ बाळाजी नकाते (४०)
 अनंत सावंत (६०) (चिपळूण)
 सोहन सुर्वे (३०)
 केतन दुंगार (३५)
 अक्षय नामदेव वेंगुर्लेकर (३०) डोंबिवली
 निखील उल्हास कडवेकर (१५) (संगमेश्वर)
 सायली उल्हास कडवेकर (१६) (संगमेश्वर)
 प्रदीप शंकर सांगरे (१७) (संगमेश्वर)
 रत्नाकर गोपाळ दळवी (१३) (कणकवली)
 प्रेरणा प्रदीप सांगरे (२८)
 भागश्री तळे (पाली)
 भालचंद्र नारायण तळे (पाली)
 अनंत यशवंत तळेकर (५२)
 कविता हुळे (६०) (वैभववाडी)
 हर्षदा दिलीप राणे (८)
 दीपक दत्तात्रय कोळेकर (२५) (भिवंडी)
 वैभव विष्णू गोसावी (१८) (वणी)
 शांता आडावकर (६०) (खांदेश्वर)
 दिपाली दत्तात्रय पोळेकर (५०) (गोवंडी)
 दीपक रॉय (५०) कल्याण
 विनय मुक्ते (१८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here