तालुका संघाचाही गौरव करणार

0
1316

उत्कृष्ट कार्य करणार्‍या तालुका पत्रकार संघाचाही गौरव करणार- एस.एम.देशमुख

राज्यातील उत्कृष्ट जिल्हा संघांप्रमाणेच राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या तालुका संघांनाही वसंत काणे यांच्या नावाने उत्कृष्ट तालुका संघ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हवेली तालुका पत्रकार संघांच्यावतीने काल उरूळी येथे एस.एम.देशमुख तसेच हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील जगताप यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे होते.
सत्काराला उत्तर देताना एस.एम.देशमुख यांनी राज्यातील उत्कृष्ट जिल्हा संघांना रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.आता त्याच धर्तीवर परिषदेशी संलग्न असलेल्या 342 तालुका संघातून योग्य संघांची निवड करून त्यांना सन्मानित कऱण्यात येणार आहे.प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे नऊ विभागातून ऩऊ पत्रकार संघ निवडले जातील.त्यासाठी विभागीय सचिव तसेच संबधित विभागातील जिल्हा अध्यक्षांची सिफारस आणि प्रत्यक्ष कार्यअहवाल पाहून ही निवड केली जाणार आहे.तालुका संघांना प्रोत्साहन मिळावे,राज्यस्तरावर त्यांच्या कार्याचे कौतूक व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.उत्कृष्ट संघटने,एकोपा,परिषदेच्या कार्यातील सहभाग,सामाजिक कार्य,वेळेवर निवडणुका होणे,आणि संघाची जनमानसातील प्रतिमा आदि गोष्टींचा उत्कृष्ट तालुका पत्रकार संघाची पुरस्कार देताना विचार केला जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हवेली तालुका पत्रकार संघ करीत असलेल्या कार्याचे तसेच मावळते अध्यक्ष शरद पुजारी यानी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचे देशमुख यांनी कौतूक केले.तसेच सुनील जगताप यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कांबळे,सरचिटणीस क्षीरसागर तसेच किशोर मेमाणे सुनील वाळूंज आदि उपस्थित होते.गणेश सातव यांनी सूत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here