होय,रस्त्यासाठीही पत्रकारांंनी रस्त्यावर उतरलंच पाहिजे कारण..

0
1524

त्रकार संघटनांनी काय करावे अाणि काय नाही याचे अनाहूत सल्ले अधुनमधून काही मित्र देत असतात.पत्रकार संघटनांना रिकामटेकडयांचा उद्योग समजणारे हे मित्र संघटनांपासून चार हात अंतर ठेऊनच सल्ले देण्याची भूमिका पार पाडतात.अशा “सल्लेदारां”चा आम्हाला कधी राग येत नाही.गंमत मात्र नक्की वाटते.काऱण पत्रकारांच्या हितासाठी लढल्या जाणाऱ्या कोणत्याही लढ्यात ही मंडळी कधी सहभाग घेत नाही अथवा त्याला दुरूनही पाठिंबा देत नाही.पत्रकार चळवळीच्या बातम्या देतानाही नेहमीच सल्ले  देणारांचा हात अखडता असतो.न मागता सल्ले द्यायला मात्र ही मंडळी नेहमीच अग्रसर असते।

पत्रकार पेन्शनचा विषय गेली वीस वर्षे  मराठी पत्रकार परिषदेने लाऊन धरलाय त्याचं फळ आता मिळतंय,पत्रकारांना पेन्शन दोन महिन्यात सुरु करण्याची घोषणा परवा मुख्यमंत्र्यांनी परिषदेच्या अधिवेशनात केली.पत्रकार गृहनिमार्णचा विषय असेल,पत्रकारांवरील हल्लाचा आणि त्यानिमित्तानं निर्माण  होणाऱ्या अभिव्यक्ती,लेखन स्वातंत्र्याचा  असेल, किंवा छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांच्या जाहिरातीचा विषय असेल,हे विषय परिषदेनं सातत्यानं हाताळले आहेत,ते सोडविलेही आहेत.शंकरराव चव्हाण कल्याण निधीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांना एक लाख रूपयांपयर्त मदत मिळले.हा निधी राजकारण्यांनी स्वतःहून स्थापन केला असेल असं कोणाचं म्हणणं असेल तर मग  विषयच संपतो.पत्रकारांच्या हिताची कोणतीही गोष्ट राजकारणी भांडल्याशिवाय देत नाहीत हा अनुभव आहे.पत्रकार भवनाचे प्रश्नही परिषदेने मांडलेले आहेत. या साऱ्या प्रश्नासाठी परिषद  अनेकदा रस्त्यावरही उतरली आहे.

परिषद  ही माध्यमातील श्रमिक,अधर्वेळ,स्ट्रींजर,मालक आणि इलेक्टाॅनिक अशा सर्व  घटकांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे.सर्व  घटकांचे समान हित पाहूनच परिषदेला विषय हाती घ्यावे लागतात,त्यासाठी भांडावे लागते.वेतन आयोगाचा विषय हाती घ्यावा असं संघटनेबाहेरच्यांना वाटलं म्हणून तसं होत नाही.शिवाय ज्यांना हा विषय महत्वाचा वाटतो त्यांनी तरी त्यासाठी काय प्रयत्न केले,? किती अग्रलेख लिहिले,आपल्या हातातील पत्राच्या माध्यमातून किती पाठपुरावा केला? हा मुद्दा कायम राहतो.स्वतः काहीच करायचं नाही,घेतलीच तर नेहमीच नकारात्मक भूमिका घ्यायची आणि दुसऱ्यांना न मागता सल्ले द्यायचे असा प्रकार काही मित्र सातत्यानं करीत असतात. हे सल्ले माध्यमातील विशिष्ट घटकांपुरते आणि साठीच  असतील तर त्याची दखल घेतली जाणं शक्य नसतं हे लक्षात घेतलं पाहिजे.

“रस्त्यांसाठी पत्रकारांनी रस्त्यावर उतरावे काय” ?  हे पत्रकारांचे काम आहे का ?असे  सवाल काही मित्र उपस्थित करतात.याचं उत्तर मी होय असंच देईल.मुंबई-गोवा महामागार्वर दररोज दोन माणसं मृत्यूमुखी पडतात.वषार्ला ६०० ते ७०० निष्पाप माणसं बळी जातात.त्याच्या चारपट कायमचे जायबंदी होतात.बधीर राजकाऱण्यांना याचं काहीच वाटत नाही कारण त्यांचे हितसंबंध आडवे येतात.त्यामुळं या विषयावर ते काहीच बोलत नाहीत.राजकाऱणी बोलणार नसतील तर पत्रकारांनीही डोळेबंद करून बसावं असं काही मित्रांना जरूर वाटू शकतं मात्र आम्हाला तसं वाटत नाही.अनेक वषेर् वाट पाहिल्यानंतर पत्रकारांनी हा विषय हाती घेतला..बातम्या देणं,अग्रलेख लिहिनं हे आपलं कामच आहे ते आम्ही सारे करीतच होतो पण नुसत्या बातम्या देऊन आणि अग्रलेख लिहून सरकारवर काहीच परिणाम होत नाही हे वास्तव जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही रस्तयावर उतरलो.२००८ पासून ही लढाई सुरू आहे.याचा चांगला परिणाम झाला आणि २०१२ मध्ये  पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं.नवं सरकार येताच हे काम बंद पडल्यानंतर काम सुरू करावं यासाठी पुन्हा कोकणातील पत्रकार रस्त्यावर उतरत आहेत.पटापट माणसं मरत असतानाही पत्रकारांनी गप्प बसून राहायचं,रस्त्यावर उतरायचं नाही असं ज्यांना वाटत त्यांच्या मतांची पर्वा  करण्याची गरज आम्हाला वाटत नाही.काहीच न करणारे दुसऱ्यांच्या पायात पाय घालण्याचं काम चांगलं करतात हा आमचा अनुभव आहे.अशांची आम्ही चिंता करीत नाही,कऱणार नाही.मराठी पत्रकार परिषद या संस्थेची नोंदणी धमर्दाय आय़ुक्तांकडं झालेली आहे.१९७२ ला जी घटना आम्ही तयार केली होती त्यात सामाजिक उत्तरदायीत्व निभावण्याचीही गोष्ट  केली आहे.आम्ही काही ट्रेड युनियन कायद्यांतगर्त नोंदले गेलेलो नाहीत.हे वास्तव आमचे मित्र लक्षात घेत नाहीत.ज्यांची नोंदणी ट्रेड युनियन अॅक्टखाली झालेली आहे अशी ज्येष्ठ मंडळी नोकऱ्या जाण्याच्या भितीनं मजिठियाबाबत मुग गिळून आहेत.त्यावर कोणी भाष्य करीत नाही.मजिठिया आयोगाच्या शिफारशींची तातडीनं आणि पुवर्लक्ष्यी अंमलबजावणी करावी असा आदेश सवोर्च्च न्यायालयानं दिल्यानंतर ती बातमी किती दैनिकांनी छापली.? त्या निणर्याचं स्वागत करणारे अग्रलेख किती संपादकांनी लिहिले,? त्याचा पाठपुरावा किती दैनिकांनी केला? आणि किती संपादकांनी आपल्या मालकांकडे आपल्या दैनिकात मजिठिया लागू करावा म्हणून अाग्रह धरला ? या साऱ्या प्रश्नाचं उत्तर फार कोणी नाही असंच द्यावं लागेल.तुम लढो हम कपडे सांभालते अशी  ही भूमिका आहे।  ती  आम्हाला अजिबात मान्य नाही.

मराठी पत्रकार परिषदेचा वारसा हा सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या संपादक,पत्रकारांचा आहे.परिषदेचे संस्थापक काकासाहेब लिमये यांनी स्वतः सामाजिक चळवळीत भाग घेतला होता.न.र.फाटक,ज.स.करंदीकर,य.कृ.खाडिलकर,दा.वि.गोखले,यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि त्यासाठी तुरूंगवासही भोगला.कुणी सांगितले होते त्याना हे उद्योग करायला ? त्यांनी केवळ बातम्याच द्यायच्या किंवा अग्रलेखच लिहायचे ना.आचायर् प्र.के.अत्रे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतली भूमिका किती महत्वाची होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही.ह.रा.महाजनी असतील,रामभाऊ निसळ असतील,हैदराबाद मुक्ती लढ्यात ज्यांनी अत्यंत जोखमेची आणि महत्वाची भूमिका पार पाडली ते अनंत भालेराव,  सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी हयात घालविणारे बाबुराव जक्कल असतील,तरूण भारतकार बाबुराव ठाकूर यांनी तर कनार्टकच्या दुर्गम  भागात १८० शाळा सुरू करून ज्ञानगंगा लोकांच्या दारात घेऊन जाण्याचे काम केले,विशाल सहयाद्रीकार अनंतराव पाटील यांनी हरिजन उद्दार आणि कामगार आणि विध्याथ्यार्ंच्या कल्याणासाठी मोठं काम केलं.धुळ्याच्या कांतिलाल गुजराथी यांना सावर्जनिक काका का म्हटले जायचे हे त्यांनी केलेले सामाजिक कार्य  माहित करून घेतल्याशिवाय समजणार नाही.दादासाहेब पोतनीस यांनी नाशिकच्या टेभेंगावात केलेले कार्य ,आणि नाशिकचं अौद्योगिकरण व्हावं यासाठी त्यांनी केेलेले प्रयत्न नाशिककर विसरू शकणार नाहीत.रंगा आण्णा वैद्य आणि बाळासाहेब मराठे यांनी सोलापूर आणि अमरावतीत केलेले काम लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढे उभारण्याची घेतलेली भूमिका वातानुकूलीत खोलीत बसणाऱ्यांना समजणार नाही.जनशक्तीचे संस्थापक असलेल्या ब्रिजलाल पाटील यांनी जळगावमध्ये रेल्वे प्रवासी संघटना,एस.टी.कामगार संघटना कश्यासाठी स्थापन केल्या?,इंडो-अमेरिकन संघटनेत ते कश्यासाठी काम करीत होते,? आंतरराजीय विवाह करून त्यांनी जातीअंताची चळवळ स्वतःपासून कशी सुरू केली आणि हुंडयाच्या विरोधात त्यांनी कश्यासाठी आवाज उठविला,आणि ते सेवा दलात तरी काय करीत होते? याची उत्तर शोधण्यासाठी आपल्या बुध्दीचा तटस्थपणे वापर केला पाहिजे.भाई मदाने यांना धुळेकरांनी लोकमित्र ही उपाधी केवळ त्यांनी बंद खोलीत बसून अग्रलेख लिहिल्यामुळे दिलेली नाही.नांदेडच्या सुधाकर डोईफोडे यांनी मराठवाड्यात रेल्वे यावी यासाठी जिवाचं रान केलं,अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली,स्वतःला अटक करून घेतली.हा उद्योग त्यांना कोणी सांगितला होता.?

मराठी पत्रकार परिषदेच्या काही अध्यक्षांचाच वरती   उल्लेख के ला आहे.टिळकांची  पत्रकारिता ,अागरकरांची पत्रकारिता,डा.बाबासाहेब आंबडकरांची पत्रकारिता ,महात्मा गांधींनी पत्रकार म्हणुन काय   काय केले? .पत्रकारिता करताना या सर्व  महनीय पत्रकारांनी  किती सामाजिक प्रश्न हाताळले,किती लढे उभारले ते मी सांगत नाही.त्यांची बरोबरीही मी करीत नाही.त्यांच्या पासंगालाही आम्ही पुरणार नाहीत.परंतू त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो संदेश आपल्या कार्यातून  पत्रकारांना दिला त्यानुसार काम कऱण्याचा आमचा प्रयत्न आहे.मुंबई-गोवा महामागार्साठीची आमची लढाई असेल,यापुवीर् सेझ विरोधी दिलेला लढा असेल,भूसंपादनाबाबतची आमची भूमिका असेल,विमानतळ विरोधी लढा असेल हा त्याचाच भाग आहे.कृषीवलकार नारायण नागू पाटलांनी याच मागार्नं जात जगातील शेतकऱ्यांचा पहिला संप अलिबाग तालुक्यात चरी येथे घडवून आणला होता.त्याच मागार्वरून आम्ही चालण्याचा प्रयत्न करीत असू तर कुणाची पोटदुखी होण्याचं अजिबात  कारण नाही. (एस। एम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here