प्रिन्ट मिडियाला मरण नाही

0
1551

 दिल्ली

टीव्हीमुळे वाचन संस्कृती रसातळाला जाईल, ई-बुक्समुळे छापील पुस्तकांची मागणी घटेल, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे रेडिया इतिहासजमा होईल आणि होम व्हिडिओमुळे थिएटर्स ओस पडतील, अशी भाकीतं काही दिवसांपूर्वी केली जायची. आजही केली जातात. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या या लाटेत आजही रेडिओ, पुस्तके, वाचन संस्कृती टिकून आहे. किंबहूना ती वाढतच आहे. देशातील वृत्तपत्रांच्या बाबतीतही हीच बाब समोर येत आहे.

देशातील नोंदणीकृत वृत्तपत्रांची संख्या आता लाखावर पोहोचली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत देशातील वृत्तपत्रांची संख्या ७७,३८४ वरून ९९,६६० वर पोहोचली आहे. देशाची एकूण साक्षरता ६४ टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेबसाइटस्, स्मार्ट फोनवरील नानाविध अॅपस्च्या गर्दी भारतात वृत्तपत्रे आले स्थान टिकवून आहेत. एवढच नव्हे तर, गॅझेटस् च्या जमान्यात देशात वृत्तपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. भारतातील वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक वृत्तपत्रे हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहेत.त्यात खालोखाल मल्याळम, बंगाली, मराठी, गुजराती, तेलुगू वृत्तपत्रांचा क्रमांक लागतो. इलेक्ट्रॉनिक मीडिया अत्यंत वेगाने बातम्या पोहचवत असला तरी, विश्वासार्हतेसाठी आजही वृत्तपत्रांना पसंती दिली जात आहे.स्थानिक बातम्यांसाठी वाचकांची पसंती घटनांचे विश्लेषण, तसेच बातमी मागील बातमी समजून घेण्यासाठी सहज हताळता येणारे माध्यम म्हणून आजही लोकप्रिय व्यावसायिकांसाठी जाहिरातीचे उत्तम माध्यम

इंग्रजी वृत्तपत्रांचा देश

भारताला इंग्रजी भाषिक वृत्तपत्रांचा देश म्हणून ओळखले जाते. इंग्रजी भाषिक वृत्तपत्रांचे वाचक भारतातच सर्वाधिक आहेत. सध्या सुरू असलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी स्थानिक आवृत्त्या सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे येत्या काही काळात इंग्रजी वृत्तपत्रांची आणि त्यांच्या वाचकांची संख्या आणखी वाढणार आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात दर वर्षे ८ टक्के वेगाने वृत्तपत्रांच्या वितरणात भर पडत आहे. तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरात व्यवसाय २०१५ पर्यंत आणखी १२ टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहेत.

गेल्या चार वर्षांत देशात ‘रजिस्टर न्यूजपेपर फॉर इंडिया’कडील (आरएनआय) नोंदणीकृत वृत्तपत्रे ७७,३८४ वरून ९९,६६० झाली आहेत. वृत्तपत्रांची ही वाढ २८.७९ टक्के इतकी आहे. – प्रकाश जावडेकर, माहिती प्रसारण मंत्री       (महाराष्ट्र टाइम्सवरून साभार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here