महायुतीचा अलिबागला महामेळावा

0
659

शिवसेना-भाजप महायुतीचा महामेळावा 29 मार्च रोजी रायगड जिल्हयात अलिबाग येथे होत असल्याची माहिती शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी पत्रकारांना दिली.या मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे,आरपीआयचे नेते रामदास आठवले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदि या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.शिवसेनेचे रायगडचे उमेदवार अनंत गीते याच दिवशी आपला उमेदवारी अर्जही भरणार आहेत.
आठ वर्षांपासून रायगडच्या राजकारणात सक्रीय असलेली शिवसेनेबरोबरची युती तोडण्याची घोषणा शुक्रवारी शेकापने केल्याने शिवसेना-भाजप युतीच्या महामेळाव्यास विशेष महत्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here