कॉग्रेस पक्षात अस्वस्थ असलेले नारायण राणे नवा कोणता पवित्रा घेणार याची च र्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या चालू आहे.याबाबतच्या दोन शक्यता व्यक्त केल्या जातात.नारायण राणे भाजपमध्ये जातील किंवा कॉग्रेसमध्येच राहून नाराज आमदारांच्या साथीनं दवाव वाढवतील.एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करता दुसऱी शक्यताच अधिक वाटते.याची काही कारणं आहेत.मुळात नारायण राणे यांना भाजपमध्ये घेण्यास भाजप किती अनुकूल आहे ते सांगता येणं अवघड आहे.एकतर नारायण राणे महत्वाकांक्षी नेते आहेत.त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय.भाजपमध्ये अगोदरच या पदासाठी अनेकजण रांगेत आहेत.रांग तोडून राणेंना कोणी आत शिरकाव करू देईल अशी अजिबात शक्यता नाही.शिवाय शिवसेनाही त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही हा एक भाग झाला..नारायण राणे यांच्या अंगानं विचार करायचा तर भाजपमध्ये जाऊन राणे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही आणि सिंधुदुर्गातील लोकसभा किंवा विधानसभाही नारायण राणे यांना मिळणार नाहीत.कारण युतीत सिंधुदुर्ग आणि रायगड या लोकसभेच्या दोन्ही जागा सेनेच्या वाट्याला गेलेल्या आहेत.विधानसभा मत दार संघही सेना राणेसाठी सोडणार नाही.त्या अर्थानंही भाजपमध्ये जाऊन नारायण राणे यांचा फायदा नाही.मनसेचा एक ऑप्सन गृहित धरता येऊ शकेल.मात्र राणे मनसेत जाणार नाहीत.शिवसेनेतही परत जाणार नाहीत.राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच नाही.म्हणजे नारायण राणेंकडे फारच कमी पर्याय आहेत.ते पर्यायही लाभ मिळवून देणारे नसल्यानं त्यांना कॉग्रेसमध्येच मुक्काम ठेवावा लागणार आहे..त्यामुळं ते कॉग्रेसमध्ये राहूनच दबाव वाढवतील आणि आपल्या पदरात काही पडतंय का याची चाचपणी करतील असं ठामपणे म्हणता येईल.प्रश्न इथंच संपत नाही.राणेच्या अशा दबावाला कॉग्रेस हायकमांड बळी पडेल का हा प्रश्न शिल्लक राहतोच.या प्रश्नाचं उत्तरही नकारार्थीच द्यावं लागेल.याचं कारण असं की,देशात कॉग्रेस अडचणीत असली तरी नारायण राणे यांची अरेरावी पक्षानं सहन केली तर त्याचे परिणाम अन्य राज्यातही पक्षाला भोगावे लागतील.तो धोका हायकमांड स्वीकारणार नाही.तात्पर्य असे की,अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करताना पक्षानं राणे यांच्या ़थय़थयाटाकडं जसं दुर्लक्ष केलं तसंच दुर्लक्ष यावेळीही केलं जाईल आणि आगामी विधानसभा निवडणुका पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच लढविल्या जातील हे नक्की.म्हणजे पक्षात राहूनही कोंडमारा आणि बाहेरपडून लाभाची शक्यता नसल्यानं नारायण राणेंची अवस्था इकडं आड,तिकडं विहीर अशी झाली असल्यास नवल नाही.
नारायण राणे पक्षात नाराज का आहेत ? याचं कोडंही अनेकांना सुटत नाही.”राणे यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि पक्ष त्यांना ते पद देत नाही” हे राणे यांच्या नाराजीचं एक कारण सांगितलं जातं .हेच त्यांच्या नाराजीचं काऱण असेल तर ते कॉग्रेसमध्ये गेल्यापासूनच नाराज आहेत असं म्हणता येईल.अशा नाराजांची कॉग्रेसमध्ये फारशी द खल घेतली जात नाही.हे राणे यांनाही माहिती असल्यानं ते या नाराजीला लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा एक पैलू जोडायला लागले आहेत.”विद्यमान नेर्तृत्वामुळेच राज्यात कॉग्रेसची धुळधाण उडाली आणि चव्हाण यांच्या नेर्तृत्वाखालीच विधानसभा लढविली गेली तर जे लोकसभेत घडले तसेच विधानसभेत घडेल” असं राणे याचं म्हणणं आहे.निवडणुकाचं खापर सर्वस्वी मुख्यमंत्र्यांवर फोडणं योग्य नाही असं अनेकांना वाटतं.याचं कारण पक्षाचा पराभव केवळ महाराष्टातच झालेला नाही . तो देशभर झालेला आहे.म्हणजे हा कॉग्रेसविरोधी लाटेचा परिणाम आहे.या लाटेत नारायण राणे यांना स्वतःची जागाही टिकविता आलेली नाही.निकाल लागल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले होते, “जिथंलं नेर्तृत्व सक्षम ति थं कॉग्रेस जिंकली आहे” .हा टोला मुख्यमंत्र्यांना होता तरी हा निकष लावायचा ठरला तर नारायण राणे याचं सिंधुदुर्गातील नेर्तृत्वही सक्षम नसल्यानं त्यांनाही ति थं पराभव पहावा लागला असं म्हणता येऊ शकेल.नारायण राणे यानी आपली जागा टिकविली असती तर त्यांना मुख्यमंत्र्यांना दोष देण्याचा नक्कीच नैतिक अधिकार होता.पण ज्यांना आपली जहागिरही सांभाळता आलेली नाही ते मुख्यमंत्र्यामुळंच पराभव झाला असं सांगत भूकंप घडविण्याची भाषा करीत आहेत.असा भूकंप घडविण्याची आज राणे यांची क्षमता आहे का? तर या प्रश्नाचं उत्तरही नाही असंच द्यावं लागेल.. छरिस्थितीही राणें यांच्या पुण्र्रथः विरोधात आहे.शिवसेना सोडताना राणेंसोबत काही आमदार होते.पोट निवडणुकीतही त्यांनी काही आमदार निवडणुन आणले होते.त्यामुळं कॉग्रेसनं त्याचं पायघड्या घालून स्वागत केलं होतं.आज मुख्यमंत्र्यांबरोबर कोणी आमदार भलेही नसतील पण म्हणून ते राणेच्या दावणीला बांधले जातील अशी स्थिती नाही.शिवाय बाबांच्या विरोधात जायचं म्हणजे हायकमांडच्या विरोधात जाण्यासारखं आहे हे नाराज आमदारांनाही माहिती आहे.पक्ष कितीही अडचणीत असला तरी हायकमांडला आव्हान देण्याचं धाडस विद्यमान आमदारांमध्ये नाही.याचं कारण त्यांच्याजवळही नारायणराणे यांच्या प्रमाणेच पर्याय नाहीत.भाजपमध्ये जाऊन लगेच विधानसभेची तिकीटं मिळतील अशी शक्यता नाही.त्यामुळं आहे तिथंच थाबून एकदा नशिब आजमावावे अशी अनेक आमदारांची मानसिकता आहे.ऱाणे यांच्याबरोबर जाऊन स्वतःची फरफट करून घेण्यास म्हणूनच कॉग्रेसमधील सावध आमदार तयार असणार नाहीत.नारायण राणे यांच्यासमवेत शिवसेनेतून कॉग्रेसमध्ये गेलेले श्याम सावंत असतील किंवा अन्य आमदारांचे नंतरच्या काळात किती हाल झाले आणि आज ते कोठे आहेत याची माहिती अनेकांना असल्यानं असे आमदार ं आज राणे यांच्या पक्षांतर्गत किंवा पक्षविरोधी संभाव्य बंडाला किती साथ देतील याबद्दल आम्ही साशंक आहोत..राणेंनाही हे दिसतंय म्हणूनच दोन दिवस थांबा -चार दिवस वाट पहा असे वायदे राणे करीत आहेत.दुसरीकडं ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर बंद खोलीत च र्चाही करीत आहेत.शिवसेना सोडताना त्यांनी अशी च र्चा बाळासाहेब ठाकरे किंवा उध्दव ठाकरे यांच्याशी केल्याचं ऐकिवात नाही.म्हणजे त्यांचा नि र्णय़ होत नाही. नारायण राणे धाडसी आहेत,आक्रमक आहेत आणि जे मनाला येईल ते करणारे नेते आहेत.शिवसेनेत हे गुण समजले जातात. कॉग्रेसमध्ये हेच वैगुण्य ठरते. अशी आक्रमकता कॉग्रेस संस्कृतीला न मानवणारी आहे.त्यामुळं त्यांनी आता कितीही आदळ-आपट केली तरी फार काही त्यांच्या मनासारखं घडेल अशी शक्यता नाही.क्षणभर असाही विचार करा की,राज्यात नेर्तृत्व बदल करून नारायण राणे यांना मुखय्मंत्री केलं तरी नारायण रामे फार काही चमत्कार घडवू शकतील असंही नाही.त्यांच्या हाती जादूची कांडी नाही आणि मुळात कॉग्रेस-राष्ट्रवादीला जनता विटलीय.त्यामुळं दिल्ली प्रमाणंच मतदारांना राज्यातही परिवर्तन हवंय.परिवर्तनाचा हा पर्याय स्वीकारल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.मग नारायण राणेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट केले काय किंवा शरद पवारांना फरक पडण्याची शक्यता नाहीच..उलटपक्षी एका सज्जन माणसाला कॉग्रेसनं बदलंलं अशी प्रतिमा तयार होईल.मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत असा जो प्रचार कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतात तो प्रचार जनतेला मान्य नाही.कारण ज्या भानगडीच्या फाईली आहेत त्यावर मुख्यमंत्री नि र्णय घेत नाहीत हे एव्हाना जनतेला कळलेले आहे.त्यामुळं हाताला लकवा भरलाय वगैरे गोष्टी जनतेच्या मनाला भिडलेल्या नाही.उलट भ्रष्टाचार,महागाई आदि मुद्देच जनतेने कॉग्रेसविरोधी कौल देण्यास कारणीभूत ठरेलेले आहेत.या दोन्ही गोष्टी उद्या राणे मुख्यमंत्री झाले तरी थांबवू शकत नाहीत.त्यामुळं नेता कोणीही असलं तरी विधानसभेतही कॉग्रेसचं पानिपत ठरलेलं आहे.
एस.एम.देशमुख