रायगडात शेकापचं गणित चुकलंच…

0
1222

16 मे नंतर रायगड जिल्हयात  काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.लोकसभा निकालानंतर जिल्हयात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी तर होणारच आहेत पण त्यात सर्वात मोठी पडझड  शेकापची होणार हे स्पष्ट दिसतंय.याला कारण ठरणार आहे,जयंत पाटील याचं  धरसोडीचं,  काहीसं आत्मकेंद्री राजकारण.लोकसभा निडणुका जाहीर होताच जयंत पाटील यांनी शिवसेनेशी काडीमोड घेतला.हा नि र्णय घेताना स्वतःला रायगडमधील राजकारणातले चाणक्य समजणाऱ्या जयंत पाटलांना भविष्यात या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत  याचा अंदाज आला नसावा. त्यामुळंच स्वतःचा उमेदवार उभं कऱणं किंवा मनसेला डोळे मारणं या सारख्या  गोष्टी घडल्या.हे सारं राजकाऱण  आमदार विवेक पाटील यांना मान्य असणं शक्य नव्हतं.कारण त्यांना शिवसेनेचे मोठं बळ उरणमध्ये मिळत असल्यानं त्यांना ही ताकद तोडून भागणारं नव्हतं. त्यांनी त्यातून  आदळ-आपट केली.सर्वांच्या लक्षात येईल अशा पध्दतीनं नाराजी व्यक्त केली. – यातूनच मग ” विवेक पाटील शिवसेनेच्या वाटेवर ” अशाही बातम्या आल्या. त्यामुळं  असेल कदाचित किंवा निकालानंतरचे परिणाम उशिरा  लक्षात आल्यामुळं असेल पण सुरूवातीला जयंत पाटलांनी शिवसेनेवर ज्ी तोफ डागली होती ,नंतरच्या काळात या तोफेचं तोंड त्यांनी सुनील तटकरे यांच्या दिशेनं वळविलं.अन सुनील तटकरे यांच्या कथित भ्रष्टचारापासून ते त्यांच्या कुटुंबातील वादापर्यत त्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या.सुनील तटकरेंच्या घरातील वाद चव्हाट्यावर आणताना जयंत पाटील हे विसरले की,आपल्या घरात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.सुनील तटकरेंनी  देखील मग ते जनतेच्या न जरेस आणून दिलं.या वादावादीत दोन्ही पक्षातील आणि नेत्यांमधील कटुता अधिकच वाढली.सुरूवातील असे संकेत येत होते की,शेकापनं रायगड आणि मावळमध्ये उमेदवार उभे करण्याचं राजकारण अजित पवारांच्या पातळीवर शिजलं होतं.अनंत गीते यांना गेल्या वेळेस शेकापची जी मतं मिळाली, त्याचं विभाजन झालं तर सुनील तटकरेंचा मार्ग सोपा होईल हे यामागचं सरळ गणित होतं.यात राष्ट्रवादीचा नक्कीच फायदा होता पण शेकापसाठी हा डाव आतबट्‌ट्याचा होता,हे ज्याला राजकारण कळत नाही त्याच्याही लक्षात येत होतं.कारण शिवसेनेशी काडीमोड याचा अ र्थ जिल्हा परिषेदेतील सत्तेवर पाणी सोडण्यासारखं होतं. ,शिवाय उरण आणि अगदी पेणमधील आमदारकीही धोक्यात येणार होती.या खेरीज ग्रामपंचायतीपासून अनेक ठिकाणच्या युत्या तोडाव्या लागल्या तर त्यात शेकापचेच मोठे नुकसान होणार होते.जेव्हा उमेदवार उभा करीत मनसेचा पाठिंबा घेण्याचं राजकारण ठरलं तेव्हा लोकसभेनंतर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी – शेकाप युती करायची आणि अध्यक्षपद  शेकापला द्यायचं असं ठरलेलं होतं,किंवा असावं.हे तेव्हा जयंत पाटील यांनी देखील अप्रत्यक्ष मान्यच केलं होतं “.शिवसेने बरोबरची युती तोडताय,जिल्हा परिषदेत काय करणार” ? असा प्रश्न जेव्हा जयंत पाटलांन ा विचारला गेला होता,तेव्हा ” जिल्हा परिषदेत माझ्याकडं दुसरं सूत्रं तयार असल्याचं ” उत्तर त्यांनी दिलं होतं.हे दुसरं सूत्र म्हणजे राष्ट्रवादी.मात्र विधानसभेत आपली खरी लढाई कॉग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच असल्यानं त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेत बसणं योग्य नाही,ते जनताही मान्य कऱणार नाही.अशा स्थितीत “तेलही गेले आणि तुपही गेले”  अशी आपली अवस्था होणार हे जयंत पाटलांच्या लक्षात आले किंवा त्यांच्या लक्षात आणून दिले गेले आणि जयंत पाटील यांनी मग राष्ट्रवादीबरोबरच्या मनोमिलनाची योजना बाजुला ठेवत  तटकरेंवर हल्लाबोल सुरू केला.त्यासाठी डुप्लीकेट सुनील तटकरे उभा करण्याची तीच ती घासून घासून गुळगुळीत झालेली खेळी खेळली.अ,र,अंतुलेचा पाठिंबा घेण्याचाही अत्यंत आत्मघातकी नि र्णय घेतला.आपल्या उमेदवारांना मुनलाईटवर घेऊन जाऊन त्यांना अंतुलेच्या पायावर ठेवणं,अंतुलेंची टेप ऐकविणं,आणि अंतुलेंचं पत्र जाहीर करणं ,आणि आपल्या बॅनरवर अंतुलेंचा फोटो लावणं हे सारे प्रकार सच्च्या शेकापवाल्यालाही आवडले नाहीत.राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही हे सा़ऱ्यांनाच माहिती आहे पण गेले पन्नास वर्षे शेकापनं ज्या अंतुलेंना पाण्यात पाहिले आणि ज्या अंतुलेंनी संधी मिळेल ति थं शेकापला संपविण्याचा प्रयत्न केला त्या अंतुलेंचा बॅनरवरचा फोटो पाहून  चार चार पिढ्या शेकापवर प्रेम करणारेही अस्वस्थ झाले.बरं हे सारं कऱण्यात पक्षाचा काय फायदाय़ ? तर काहीच नाही.सुनील तटक रेनां वाढविलं कोणी,? तटकरेंचा शेकापच्या विरोधात वापर केल ाकुणी?  तर अंतुलेंनी.आज त्याचं बिनसलं असेल तर शेकापनं त्यासाठी अंतुलेंना आपला खांदा देण्याचं काहीच कारण न व्हतं.तो दिला.शेकापची ही मोठी राजकीय चूक ठरली.त्याचे परिणाम शेकापला पुढील काळात नक्कीच भोगावे लागणार आहेत. समजा या साऱ्या खेळ्या खेळल्यानं सुनील तटकरे पराभूत झाले तरी यात शेकापचा फायदा काय ?  हे कळत नाही.कारण सुनील तटकरे पराभूत झाले तरी त्याचं मंत्रीपद अबाधित राहणार आहे.म्हणजे राजकीयदृष्टया ते फार तोट्यात आहेत असं नाही. – मात्र तटक रे पराभूत झाले तर ते जयंत पाटलांना शांतपणे झोपू देतील असं अजिबात नाही.तटकरे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत शेकाप बरोबर युती कऱणार नाहीत.कारण त्यांना जिल्हा परिषदेतील एखादं -दुसरं पद मिळविण्यात फारसं स्वारस्य असण्याचं कारण नाही.जिल्हा परिषेदतील एक-दोन पदं घेण्यापेक्षा शेकापला जिल्हा परिषद  सत्तेतून हुसकावणं हे  त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकांची स्ट्रॅटिजी म्हणून महत्वाचं आहे.त्यासाठी  सुनील तटकरे कोणत्याही थराला जावू शकतात. ( कोणत्याही थराला याचा अ र्थ शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर युती करण्यापर्यत. ) .ते जमलं नाहीच   तर किमान अध्यक्षपद शेकापला आणि पाटील कुटुंबातील कोणाला मिळणार नाही याचा प्रयत्न तर सुनील तटकरे नक्कीच करतील.ज्या पध्दतीनं शेकापनं शिवसेनेला दुखवलं आहे ते बघ ता,शिवसेना सहजासहजी अध्यक्षपद शेकापला देईल याची सुतराम शक्यता दिसत नाही.युती ठेवायचीय तर अध्यक्षपद आम्हाला द्या,अन्यथा तुम्हाला कोणाबरोबर युती करायची ती करा असं जर शिवसेनेन ं शेकापला बजावलं तर शेकापची आपोआप कोंडी होऊ शकते .हे सारं  जयंत पाटलांना नंतर उमजलं का?  दिसतंय तर तसंच.कारण प्रचाराच्या  अखेरच्या टप्प्यात जयंत पाटलांनी  तोफेचं तोंड अऩंत गीतेंच्या ऐवजी सुनील तटकरे यांच्या दिशेनं वळविलं . याचा अ र्थ जयंत पाटलांना जिल्हा परिषदेतील शिवसेनेबरोबरची युती तोडायची नाही असा होतो.जिल्हा परिषद म्हणजे शेकापसाठी ऑक्सीजन आहे.तोच प्राणवायू नसेल तर शेकापचा जीव गुदमरून जाईल त्यामुळं अनेक तडजोडी करून प्रसंगी  मातोश्रीचे दरवाजे झिजवून  आणि “झालं-गेलं विसरून जा,पुढं असं होणार नाही अशा आणाभाका खात”  युती टिकविण्यासाठी आता प्रयत्न केले जातील. अगोदर” कृष्णकुंज”चे दरवाजे झिजवले,मग “मुनलाईट”वर चकरा मारल्या आता नंतरच्या काळात “मातोश्री” वर फेऱ्या मारण्याची वेळ शेकाप नेत्यांवर नक्की येणार आहे.- शेकापला मनसेपासून दूर करावं असं शिवसेनेलाही वाटणारच ना. त्यामुळं  शिवसेना  फार ताणणार नाही पण अध्यक्षपदही सोडणार नाही असे अनुमान काढता येऊ शकते.या सर्वांचा अ र्थ जयंत पाटलांचं राजकारण सपशेल त्यांच्या अंगलट आलं असा होतो.सुनील तटकरेंवर एवढे प्रहार करूनही ते विजयी झाले तर मग जयंत पाटील यांची अवस्था पाहण्यासारखीच होईल.असं झालं तर जिल्हयातील कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी अधिक भक्कम होईल अन ठरल्याप्रमाणं कॉग्रसे आणि राष्ट्रवादीचे नेते अधिक आत्मविश्वासानं विधानसभा  निवडणुकांना सामोरं जातील.त्यातून पेण धोक्यात येऊ शकते आणि अलिबागलाही निकराची झुंज शेकापला द्यावी लागेल. जयंत पाटलांचं सारं राजकारण तर्कावर चालतं.इतरांना ते गृहित धरत असतात.अनिल तटकरे किंवा अवधुत तटकरे मगाच्या प्रमाणंच  पेणमधून उभ ेराहतील आणि मग रवी पाटलांच्या  मतांचं विभाजन होऊन आपला उद्देश साध्य होईल असं जयंत पाटील गृहित ध़रून आहेत.प्रत्येक कुटुंबात वाद असतात हे सत्य असलं तरी सुनील तटकरे जर खासदार झाले तर नक्कीच असं होणार नाही.पंडित पाटील आणि आस्वाद पाटलांना कसं शांत करायचं हे जयंत पाटलांना जसं माहिती आहे तव्दतच अनिल तटकरे आणि अवधूत तटकरेंना कसं गप्प करायचं हे ही सुनील तटकरेंना माहिती आहे.त्यामुळं जर तर वर राजकाऱण यशस्वी होणार नाही हे स्पष्ट आहे.

समजा अनंत गीते विजयी झाले तर शिवसेनेचा प्रभाव जिल्हयात नक्कीच वाढेल.याचं कारण शेकाप बरोबर नसला तरी आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास शिवसेनेत बळावेल आणि प्रत्येक शिवसैनिक विधानसभा देखील अधिक निर्धारानं लढविल.अशा स्थितीत शिवसेनेने जर उरण आणि पेणला आपले उमेदवार उभे केले तर जयंत पाटलांची किती अडचण होईल हे वेगळं सांगायला नको.उरणमध्ये शिवसेनेची मतं जर शेकापला मिळणार नसतील तर विवेक पाटील नक्कीच धोक्यात येतात. – विवेक  पाटलांच्या राजकीय भवितव्यासाठी हा धोका ठरू शकतो.रामशेठ ठाकूर आणि सुनील तटकरे मिळून विवेक पाटलांना आस्मान दाखवू शकतात.पनवेलमध्ये अशा स्थितीत बाळाराम पाटील देखील उभे राहणार नाहीत.प्रशांत ठाकूर यांचा विजय मग तेथे  एकतर्फी होईल.गीते पडलेच तर मग ते आमच्यामुळेच पडले म्हणत मनसे शेकापकडं विधानसभेची एक जागा तरी नक्की मागेल.मग कदाचित शिवसेनेशी परत मनोमिलनाचे दरवाजे शेकापसाठी बंदही होतील.

– शेकापचे रमेस कदम विजयी होतील असं कोणालाच वाटत नाही.समजा अशक्य वाटणारी ही गोष्ट घडलीच तर काय होईल? ,निकाल जाहीर होताच रमेश कदम जयंत पाटील यांना भेटायला जायच्या ऐवजी  सुनील तटकरे आणि शरद पवार यांना भेटायला जातील,आणि विधानसभेच्या अगोदरच ते स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत जातील.ते एकटेच खासदार असल्यानं पक्षांतरी बंदी कायदा त्यांना अडसर ठरणार नाही.या तर्काला एक आधार असा आहे की,जयंत पाटील सुनील तटकरेंवर तोफ डागत असताना रमेश कदम एकदम गप्प होते.ते तटकरेंचे नावही घेत नव्हते.असं सांगतात की,याबद्दल जयंत पाटलांनी रमेश कदम यांची कानउघडणी दे़खील केली होती.पण त्याचा उपयोग झाला नाही. कारण रमेश कदम यांना हे नक्की माहिती आहे की,रत्नागिरीच्या राजकारणात आपणास टिकून राहायचं असेल तर  तटकरे यांना नाराज करून भागणार नाही.अशा स्थितीत निवडून येवो अ थवा न येवो रमे श कदम यांना स्वगृही परतण्यापासून जयंत पाटील रोखू शकत नाहीत. – रमेश कदम यांचा शेकापतील मुक्काम म्हणजे त्यांची  ती राजकीय आत्महत्या ठरणार आहे. रत्नागिरीत शेकापचे नामोनिशान नाही. अशा स्थितीत जनतेसााठी अनोळखी असलेल्या पक्षात राहून रमेश कदम आपल्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करू शकणार नाहीत.त्यांना मुख्य प्रवाहात यावंच लागेल. या सर्व विश्लेषणाचा अ र्थ एवढाच की,लोकसभेच्या निमित्तानं शेकापनं जे धरसोडेपणाचं राजकारण केलं ते शेकापच्या पूर्णतःअगंलट आलेलं आहे.व्यक्तीगत पातळीवर जयंत पाटील लाभात राहिले असतीलही,  किंवा काहीही झालं तरी त्याची आमदारकीही शाबूत असणार आहे पण यामुळं पक्षांतर्गत वाद सुरू झाले,पक्षाला मोठा फटका बसला,आणि पक्षाच्या जनमानसातील प्रतिमेलाही अंतुलेचें फोटो लावल्यानं तडा  गेला आणि जयंत पाटील व्यक्तीगत लाभासाठी पक्षाचा वाट्टेल तसा दुरूपयोग करतात हे चित्र  पुन्हा एकदा ठळकपणे जनतेसमोर आले. जे झालं ते ,एक दीर्घ ,ध्येयवादी आणि लढाऊ परंपरा असलेल्या शेकापसाठी चांगलं झालेलं नाही एवढंच.

 

एस . एम  देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here