बीड येथील पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी,मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हयाचे कार्याध्यक्ष , भास्कर चोपडे यांच्यावर औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृत्ती ठीक नाही.दररोज वीस हजार रूपये किंतमीचे इजेक्शन त्यांना द्यावे लागते आहे.अन्य महागडे उपचारही त्यांच्यावर सुरू आहेत.मिळणारे मासिक वेतन या शिवाय उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने चोपडे परिवार आज कोणत्या अवस्थेत असेल याची आपण कल्पना करू शकतो.त्यांच्यावरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.ते अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून त्यांना मदत मिळू शकेल पण ती सारी प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आणि त्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याने ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्यापरीनं भास्कर चोपडे यांना मदत करावी अशी विनंती आहे.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आम्ही 5000 रूपयांची मदत देत आहोत.बीड ,माजलगाव,परळी आणि अन्य ठिकाणच्या पत्रकारांनी सढळ हस्ते मदत दिली आहे किंवा दिली जात आहे.आपणही चोपडे यांना मदत करावी ही विनंती आहे .

सभा-संमेलनं,आंदोलनं हे सारं आपण करीतच असतो.परंतू यापेक्षाही आपला एखादा सहकारी अडचणीत असेल तर त्याला मदत करणं हे महत्वाचं काम आहे.परिषद त्याचदृष्टीने प्रयत्न करीत आहे.तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की,चोपडे यांच्या कुटुंबाला आपण एकटे नाही आहोत..महाराष्ट्रातील सारे पत्रकार आपल्याबरोबर आहेत अशा विश्‍वास वाटला पाहिजे आणि ते लवकर बरे झाले पाहिजेतत्यासाठी सहकार्य करावे

एस.एम.देशमुख

आपली मदत भास्कर चोपडे यांच्या खालील बँक खात्यावर जमा करता येऊ शकेल.

नावः            भास्कर लक्ष्मण चोपडे

बॅकेचे नावः स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा ः बीड

बॅक कोड नंबर ः 12240

सीआयएफ ः 86010300208

खाते क्रमांक ः 31693140277

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here