Saturday, May 15, 2021

तालुका पत्रकार संघांना आवाहन

मराठी पत्रकार परिषद ,मुंबई 

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार

प्रवेशिका पाठविण्याचे तालुका संघांना आवाहन

महाराष्ट्रातील 300 ते 325 तालुके मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.हे सारे तालुका पत्रकार संघ  म्हणजे परिषदेचा आत्मा आहेत.अगदी तळागाळात राहून निष्ठेनं पत्रकारिता आणि सामाजिक कार्य कऱणारी ही पत्रकार मंडळी परिषदेसाठी अभिमानाचा विषय आहे.त्यामुळं महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून राहूनही पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या भागाच्या विकासात मोलाचं योगदान देणार्‍या तालुका पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेतली पाहिजे या जाणिवेतून गेल्या वर्षीपासून आपले दिवंगत अध्यक्ष वसंतराव काणे यांच्या नावाने आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार योजना परिषदेने सुरू केलेली आहे.गेल्या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण नागपूर येथे झाले आहे.2017 साठीच्या पुरस्कारांसाठी आता प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.3  डिसेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या वर्धापन दिनी सिंधुदुर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्याचे नक्की होत आहे.त्या कार्यक्रमात यंदाचे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करावेत अशी योजना आहे.त्यादृष्टीने विचार सुरू आहे.त्यासाठी तालुका पत्रकार संघांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

या प्रवेशिका पाठविताना खालील अटी लागू राहतील

1) केवळ जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेशी संलग्न तालुका संघांनाच पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविता येतील.

2) प्रवेशिका तीन प्रतित परिषदेच्या मुंबईतील कार्यालयात रजिस्टर्ड पोस्टाने पाठवाव्यात

3) प्रत्येक महसुल विभागातून एका तालुका पत्रकार संघाला पुरस्कार देण्यात येईल.असे नऊ पुरस्कार दिले जातील.

4) आलेल्या प्रवेशिकेतून पुरस्कार योग्य प्रवेशिकेची निवड करताना साधारणतः खालील गोष्टी पाहिल्या जातील.

अ) तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका नियमित होतात का ?

ब) तालुका पत्रकार संघांचे आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवले जातात का ?

क) तालुका पत्रकार संघाने वर्षभरात पत्रकारांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजना?

ड) सामाजिक कार्यातील पत्रकार संघाचा सहभाग?

इ) परिषदेचे उपक्रम राबविले आहेत का ? परिषदेने केलेल्या आंदोलनात पत्रकार संघाचा सहभाग?

ई) पत्रकार संघांच्यावतीने वर्षभरात घेतले गेलेले कार्यक्रम

वरील सर्व उपक्रमाची माहिती,छायाचित्र आणि बातम्यांच्या कात्रणांसह परिषदेकडे उशिरात उशिरा 20 नोव्हेंबरपर्यंत पाठवावी.

तीन सदस्यांची एक समिती आलेल्या प्रवेशिकांचा विचार करून आपला अहवाल परिषदेकडे सादर करेल.परिषद विभागीय सचिव आणि संबंधित जिल्हयाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल.

याच कार्यक्रमात रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचाही पुरस्कार दिला जाईल.परिषदेशी संलग्न जिल्हा संघातून एका संघाची निवड परिषदेचे पदाधिकारी करतील.

तालुका पत्रकार संघाने आपल्या प्रवेशिका खालील पत्यावर पाठवाव्यात

अध्यक्ष 

मराठी पत्रकार परिषद,

9 हजारीमल सोमाणी मार्ग,

ुप्रशासकीय अधिकारी महाविद्यालय वसतीगृह आवार,

छत्रपती शिवाजी टर्मिनस

मुंबई ः 400001

फोनः 022-22076459

एका भव्य आणि शानदार सोहळ्यात गेल्या वर्षीचे पुरस्कार वितऱण केले गेले होते.त्याच पध्दतीनं यंदाही पुरस्कार वितरण मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार आहे.तेव्हा राज्यातील परिषदेशी जोडल्या गेलेल्या तालुका संघांनी जास्तीत जास्त संख्येनं या स्पर्धेत सहभागी होऊन आपण ग्रामीण भागात करीत असलेल्या कार्याबद्दल जगाला अवगत करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने कऱण्यात येत आहे.

Related Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,960FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

उध्दवजी आता तरी हट्ट सोडा

मध्य प्रदेश सरकार घेणार कोराना बाधित पत्रकारांची काळजीमहाराष्ट्र सरकार आपला हट्ट कधी सोडणार : एस.एम.देशमुख मुंबई : मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यातील कोरोना...

कुबेरांची कुरबूर

कुबेरांची कुरबूर अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक विक्रम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेलेला आहे.. तत्त्वांची आणि नितीमूल्यांची कुबेरांना एवढीच चाड असती तर त्यांनी...

पत्रकारांच्या प्रश्नांवर भाजप गप्प का?

पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख मुंबई : महाराष्ट्र सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष...

वेदनेचा हुंकार

वेदनेचा हुंकार एक मे हा दिवस प्रचंड तणावात गेला.. तणाव उपोषणाचा किंवा आत्मक्लेषाचा नव्हताच.. मोठ्या हिंमतीनं, निर्धारानं अशी शेकड्यांनी आंदोलनं केलीत आपण.. ती यशस्वीही केलीत.....

पुन्हा तोंडाला पाने पुसली

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पुसली मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल अशी जोरदार चर्चा मुंबईत होती पण...
error: Content is protected !!