16 चे आंदोलन यशस्वी कराः सिध्दार्थ शर्मा

0
858
16 नोव्हेंबर ला पत्रकारांचे धरणा आंदोलन ,सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे ! — सिद्धार्थ शर्मा यांचे आवाहन                 अकोला – मराठी पत्रकार परिषदेचे झुंजार नेते एस एम देशमुख , किरण नाईक यांचे नेतृत्वात पत्रकारांच्या प्रमुख मागण्या करीता 16 नोव्हेंबर ला राज्यभर जिल्हास्तरावर पत्रकारांचे धरणा आंनदोलन आयोजित करण्यात आलेले आहे , पत्रकारांना पेंशन योजना लागू करावी , पत्रकार संरक्षण कायद्याची अमल बजावणी करावी , जिल्हा स्तरीय दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रांच्या जाहिरात दरात वाढ करावी , वृत्तपत्रांच्या द्वैवार्षिक पडताळणी च्या जाचक अटी रद्द कराव्यात , मजिठीया आयोगा संदर्भात शासनाने भूमिका स्पष्ट करावी ह्या प्रमुख मागण्या साठी होणाऱ्या या धरना आंदोलनात सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदे चे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी केले आहे , अकोला जिल्हा पत्रकार संघा तर्फे पत्रकार भवनात आयोजित धरना आंदोलना च्या पूर्व तयारी सभेत ते बोलत होते , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब , सरचिटणीस प्रमोद लाजूरकर , ज्येष्ठ पत्रकार प्रा मधू जाधव , विजय शिंदे , दीपक देशपांडे ,सदानंद खारोडे , ऍड शरद गांधी , बी एस इंगळे , कमल किशोर शर्मा , उमेश अलोने , खरात ,संजय अलाट यांच्या सह पत्रकार संघाचे सदस्य प्रामुख्याने या सभेत उपस्थित होते , सिद्धार्थ शर्मा यांनी यावेळी परिषदे तर्फे पत्रकारांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमा ची माहिती दिली , मा एस एम साहेबांच्या नेतृत्वात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला व देशात पत्रकारांसाठी असा कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले याची नोंद युनो मध्ये घेतल्या गेली ही परिषदे ची मोठी उपलब्धी असल्याचे सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले , 16 नोव्हे च्या धरना आंदोलनात सर्वांनी सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शर्मा यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here