शशिकांत सांडभोरः आपला माणूस

0
1316

शशिकांत सांडभोरः आपला माणूस 

मुंबईत इतरांचा विचार करायला,त्याची दुःख ,वेदना समजून घ्यायला,त्याच्या मदतीला धावून जायला कोणाला वेळ नाही हे म्हणणं अर्धसत्य आहे.मुंबई  घडाळ्या च्या काटयावर  धावत असली तरी हा काटा क्षणभर थांबवून इतरांची चौकशी कऱणारे आणि त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे  करणारे अनेक अवलिये या महानगरीत नक्कीच आहेत.त्यामुळे मुंबईतली माणुसकी संपलीय असं मला वाटत नाही.आपल्या सर्वाचे पत्रकार मित्र शशिकांत सांडभोर त्यापैकी एक आहेत.स्वतःची दुःख ,स्वतःच्या वेदना इतरांना कळणार नाहीत याची खबरदारी घेत इतरांचा विचार करणारा शशिकांत पाहिला म्हणजे आम्हालाही शंभर हत्तीचं बळ येतं आणि पत्रकारांसाठी आम्ही सुरू केेलेल्या चळवळी कधीच पोरकी होणार नाही याची खात्री पटते.शशिकांत सांडभोर आज कोणत्याही पत्रकार संघटनेचे पदाधिकारी नाहीत.मात्र ते स्वतःच एक संघटना आहेत.जे काम संघटना करणार नाही किंवा करीत नाही ते काम शशिकांत सांडभोर करीत असतात.कोणी अडचणीत असेल,कोणाला मदतीची गरज असेल तर तो कोणत्या संघटनेचा कोणत्या वाहिनीचा आहे याचा विचार न करता सर्वात अगोदर शशिकांत सांडभोर तेथे असतात.म्हणजे पत्रकारांसाठी ते फायरब्रिगेडची भूमिकाच बजावतात.मी स्वतः अनेकदा याचा अनुभव घेतला आहे.मध्यंतरी एका पत्रकारावर हल्ला झाला.काही व्हॉईट कॉलर मंडळी ज्या पत्रकारावर हल्ला झाला त्याची कुंडली काढण्यात आणि त्याच्याबद्दल नाकं मोडण्यात गर्क असताना शशिकांत सांडभोर त्यांना अ‍ॅब्युलन्समध्ये घालून रूग्णालायत दाखल कऱण्याच्या गडबडीत होते.हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ते रात्रभऱ तेथे होते.त्या रात्री पहाटेपर्यंत आम्ही दोघे सतत संपर्कात होतो.ही तळमळ,हा आपलेपणा,ही माणुसकी आमच्यात अभावा
नेच दिसते त्यामुळे पत्रकार वेगवेळ्या संकटांना आज तोंड देत असतात.प्रत्येक ठिकाणी श्रेयाची लढाई,प्रत्येक ठिकाणी हा माझा तो दुसं र्‍याचा हा वाद ,हा इलेक्टॉनिकवाला,तो प्रिन्टवाला ,हा या संघटनेचा तो त्या संघटनेचा असा भेद करून आपण आपल्याल भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न करीत असतो.यामध्ये काहींची हितसंबंधही असतात.मात्र शशिकांतने कधी हा भेद पाहिला नाही.पत्रकार आणि तो ही हाडाचा पत्रकार आहे ना मग तो कोण, कुठला याची पर्वा न करता त्यांनी मदतीचा हात पुढे केला.सुनील ढेपे यांचा आवाज बंद कऱण्याचा जो प्रयत्न अलिकडे झाला त्या प्रकरणात जे मुठभर पत्रकार ढेपेच्या बाजुने उभे होते त्यात शशिकांत सांडभोरही होते.केवळ ढेपेच नव्हे तर अशा असंख्य पत्रकारांना शशिकांत यांनी मदत केलेली आहे.हातात कोणतीही यंत्रणा नाही,संघटनेचं पाठबळ नाही,विधायक काम करताना होणारा विरोध पत्करून शशिकांत सातत्यानं वनमॅन आर्मीच्या भूमिकेत पत्रकारांना मदतीचं काम करीत असतात.त्यामुळेच मुंबईतील असंख्य पत्रकार,छायाचित्रकारांना शशिकांत यांचा आधार वाटतो.आपला माणूस म्हणून ते त्यांना आवाज देतात आणि शशिकातही कोणतीही अपेक्षा न ठेवता या हाकेला ओ देतात.शशिकांत सांडभोरांना माणसं जमविण्याचा ,त्यांच्यासाठी लढत राहायचा आणि त्यांना मदत कऱण्याचा छंद आहे.त्यामुळे आयुष्यात आर्थिक आघाडीवर त्यांना काही कमविता आलेही नसेल पण असंख्य माणसं त्यांनी जोडली.त्याचं हे भांडवल आहे असं मला वाटतं.शशिकांत सांडभोर चांगले संघटक आहेत,अभ्यासू पत्रकार आहेत,चांगले बातमीदार आहेत, आणि माध्यमातील घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष असते.माध्यमातील कादरखान कोण आणि अमिताभ कोण या माहितीचा खजिना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे.त्यांच्याशी गप्पा मारणं हा नवोदित पत्रकारांसाठी एक आनंद देणारा अनुभव असतो.माध्यमातील अनेक किस्से त्यांच्याकडं आहेत,अनेक गुपित आणि चारित्र्याच्या गप्पा मारणार्‍यां अनेकांच्या कुंडल्या त्यांच्या पोतडीत आहेत,त्यामुळे साधा-सरळ वाटणारा हा माणूस अनुभवाने समृध्द आहे.स्पष्ट भूमिका आणि ठाम विचार हे शशिकांत सांडभोर यांचं वैशिष्टय आहे.वारं येईल तशी दिशा बदलणं त्यांना जमलं नसल्यानं अनेकांशी त्याना विरोध घ्यावा लागला किंवा लागतो आहे.जे  चळवळे पत्रकार मुंबईत आमच्याबरोबर आहेत त्यांना ं मुंबईतील काही मतलबी मंडळी पाण्यात बघते.हा अनुभव सर्वांनाच येतो.शशिकांत यांनाही तो येतोच येतो. आम्हाला मुंबईत कोणी ओळखत नव्हते तेव्हा शशिकांत सांडभोर यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या चळवळीला मदत केली.त्यासाठी खास्ताही खाल्लया ,माझ्याबरोबर आहेत म्हणून काही कादरखानांचा त्यांना रोषही पत्करावा लागला.त्याच्या विरोधात कट-कारस्थानं करून त्यांना सार्‍या संघटनांतून बाजूला करण्याचेही प्रयत्न झाले .मात्र हे सारं होऊनही शशिकांतजींनी नेहमीच आमची आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच पाठराखण केली.कायम साथ दिली कारण ही दोस्ती विचारांवर ,परस्पर विश्‍वासावर आणि समान उध्दिष्टांवर आधारलेली आहे.त्यामुळे ना आमच्यात काही फरक पडतो ना शशिकांत यांच्यात .  त्यांच्या सारखे असंख्य सहकारी आज माझ्याबरोबर आहेत म्हणूनच मी निर्धाराने,ठामपणे ही चळवळ पुढे नेऊ शकलो आहे.

सांडभोर यांचा आज वाढदिवस आहे.त्याना शुभेच्छा देताना त्याना उत्तम आयुरारोग्य लाभावे,त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच मनोकामना.पत्रकारांसमोरील प्रश्‍नांची व्याप्ती वाढत असताना,पत्रकार समस्यांच्या चक्रव्युहात अडकत चाललेले असताना शशिकांत सारखे इतरांचा विचार करणारे कार्यकर्ते चळवळींसाठी नक्कीच मोठा आधार देऊ शकतात याबद्दल दुमत नाही.

(एस एम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here