मस्त्यव्यवसाय विभागाने 1 जून ते 31 जुलै काळात यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली असल्याने अनेक नौका मालकांनी दहा दिवस अगोदरच आपल्या नौका किनार्यांवर शाकारण्यास सुरूवात केली आहे.मासेमारी बंदीचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई कऱण्याचा इशारा सहय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अविनाश नाखवा यांनी दिला आहे.जून ते जुलै हा माश्यांचा प्रजनन काळ असतो.त्यामुळे या काळात मासेमारी बंद केली जाते.रायगड जिल्हयात 4 हजार 943 मासेमारी नौका असून त्यातील 3 हजार 444 नौका यांत्रिकी आहेत.त्यामुळे या नौकांना बंदी काळात मासेमारीसाठी समुद्रात जाता येणार नाही.मात्र बिगर यात्रिकी 1 हजार 499 नौकांना समुद्र किनारपट्टी भागात मासेमारी करता येणार आहे.जिल्हयात मच्छिमांरांची 108 गावं असून तेथील 11 हजार 620 कुटुंबातील 69 हजार 47 जण या व्यवसायावर अवलंबून आङेत-