6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.मराठीतल्या   पहिल्या  वृत्तपत्राचे   स्मरण म्हणून  महाराष्ट्रात आपण 6 जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून दरवर्षी  साजरा करतो .दर्पण प्रथम प्रकाशित झाले त्या घटनेला 6 जानेवारी 2019 रोजी 187 वर्षे होत आहेत. अनेकांची  समजूत अशी आहे  की, ( गतवर्षी आणि यंदाही काही ठिकाणी तशा बातम्याही छापून आलेल्या आहेत.ते वस्तुस्थितीला धरून नाही.) 6 जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती असते म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.ते खरं नाही.बाळशास्त्रीच्या निधनाची नक्की तारीख उपलब्ध आहे.( 17 मे 1846 ) मात्र बाळशास्त्रींचा जन्म नेमका कोणत्या तारखेला झाला याचे पुरावे उपलब्ध नाही.मात्र फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवडयात 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला असावा असा अंदाज आहे.नक्की तारीख उपलब्ध नाही .
बाळशास्त्रींच्या छायाचित्राबद्दलही संभ्रम आहे.सध्या विविध स्वरूपातली चार छायाचित्रं प्रसिद्द केली जातात त्यातील मराठी पत्रकार परिषदेने 1998 रोजी प्रसिध्द केलेले आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झालेले छायाचित्रच खरे छायाचित्र आहे.बाळासाहेबांनी देखील या छायाचित्राचे प्रकाशन करताना ‘हेच खरे बाळशास्त्री’ असे म्हटले होते.कारण बाळशास्त्रींचा मृत्यू वयाच्या अवघ्या 33 वर्षी झाला होता.म्हणजे ते तरूण होते.विद्वत्तेचं तेज त्यांच्या चेहर्‍यावर विलसत होते.व्यायाम आणि सूर्यनमस्कारामुळे त्यांची प्रकृत्ती देखील उत्तम होती.परिषदेने प्रकाशित केलेल्या छायाचित्रात या गोष्टींची काळजी घेतली होती.अन्य जी छायाचित्रे आहेत त्यात बाळशास्त्री खंगलेले,70 वर्षाचे,त्रस्त दिसतात.वस्तुस्थिती अशी नव्हती.त्यामुळं राज्यातील सर्व पत्रकार संघटनांना आणि पत्रकारांना विनंती की,मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्द केलेले छायाचित्रच 6 जानेवारी रोजी वापरावे.गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना देखील हेच छायाचित्र वापरले होते.बाळशास्त्री जांभेकराचं आयुष्यमान कमी असलं तरी 33 वर्षात त्यांनी अफाट कर्तुत्व गाजविलं होतं.त्यांच्यावर मराठीतून आणि अन्य भाषांमधून अनेक ग्रंथ प्रसिध्द झालेली आहेत.मात्र बाळशास्त्री यांची संक्षिप्त माहिती नव्या पत्रकारांच्या माहितीसाठी येथे देत आहे.इच्छूकांनी खालील लिंकवर क्लीक करून ही माहिती पाहता येईल.6 जानेवारी रोजी या संक्षिप्त माहितीचा उपयोग होईल. बाळशास्त्री जांभेकर यांची संक्षिप्त माहिती—————————————————————————
 संपूर्ण नावः   बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर
जन्म तारीख ः  1812 ( नेमकी जन्म ताऱीख उपलब्ध नसली तरी त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1812 रोजी झाला असे मानले जाते.गंगाधर शास्त्री यांना दोन मुले आणि दोन    मुली होत्या.त्यातील चौथे आपत्य  म्हणजे बाळशास्त्री जांभेकर 
जन्मस्थळ ः   निसर्गरम्य पोंभुर्ले ( ता.देवगड जि.सिंधुदुर्ग ,कोकण ) 
आईचे नाव ः   सगुणाबाई जांभेकर 
शिक्षण ः         प्राथमिक शिक्षण पोभुर्ले गावाची झाले.गंगाधरशास्त्रींसारख्या विद्ववान पित्याच्या मार्गदर्शनाखाली   त्यांनी मराठी,संस्कृतचे धडे घेतले.संत   रामदास,संत तुकाराम,वामन,मोरोपंत आदिंचं काव्य,रामायण-महाभारत व  इतिहासातील महापुरूषांच्या कथा,मराठयांच्या इतिहासाच्या बखरी  आदिंचा अभ्यास त्यांनी बालपणीच केला.आठव्या वर्षीच त्यात ते पारंगत   झाले.त्यानंतर वेदपठण संस्कृत स्त्रोत्र,भगवद्गगीता यांच्या पाठांतराबरोबरच    अमरकोश,लघुकौमुदी,पंचमहाकाव्ये इत्यादी  सस्कृत अध्ययन बाराव्या   वर्षीपर्यंत पूर्ण झाले.त्यांची धारणाशक्ती जबरदस्त असल्याने  त्यांना  बाल बृहस्पती असे संबोधले जात असे.व्यायाम आणि सूर्यनमस्कारामुळे त्यांची शरीर संपदा  चागली होती.
 मुंबईस आगमन ः    प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर 1825 च्या शेवटी बाळशास्त्री इंग्रजीचे शिक्षण   घेण्यासाठी मुंबईस आले.तेथे ते बॉम्बे नेटीव्ह स्कूल या संस्थेच्या शाळेत दाखल झाले.1830 मध्ये संस्थ  डेप्युटी नेटीव्ह सेक्रेटरी म्हणून ते रूजू झाले.वेतन होेते पन्नास रूपये.1832 मध्य नेटीव्ह सेक्रटरी  म्हणून त्यांची   नियुक्ती झाली.वेतन होते,100 रूपये.तेथे त्यांनी अध्यापनही केले. 
ग्रंथ संपदा ः  1) नीती कथा 2) सार संग्रह 3) इंग्लड देशाची बखर भाग 1,व 2 4) बाल   व्याकरण  5) भूगोल विद्या गणितभाग 6)भूगोलविद्येची मुलतत्वे 7) मरे  यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप   8)शब्दसिध्दीनिबंध 9) समीकरणाविषयी  टिपणे 10) शून्यलब्धी गणित व मूलपरिणती गणित  11)हिंदुस्थानचा   इतिहास 12) इंग्रजी मराठी धातुकोश 13) पुनर्विवाह प्रकरण 14)ज्ञानेश्‍वरी  या मौलिक श्रेष्ठ भक्तीग्रंथाचे त्यांनी मराठीत प्रथम शिळाप्रेसवर प्रकाशन  केले.वयाच्या 16 व्या वर्षापासून ते 33 व्या वर्षापर्यंत अनेक व्याप सांभाळून  त्यांनी ही ग्रंथसंपदा निर्माण केली. अनेक ग्रंथाचं भाषांतर त्यांनी केल्याने ते  भाषांतरकार म्हणूनही प्रसिध्द होते.
ओळख ः     प्रकांड पंडित अशी त्याकाळात बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख होती.नऊ देशी – विदेशी भाषा अवगत असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी जसे मराठीतले पहिले   वृत्तपत्र दर्पण सुरू केले त्याच पध्दतीनं अनेक अनेक पदं मराठी माणसाच्या  नावावर प्रथमच नोंदविणयाचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.शिक्षण  तज्ज्ञ,समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे अग्रदुत म्हणूनही त्यांची ओळख  होती.त्यांच्या विद्वत्ततेमुळे समकालिन उच्चभ्रू वर्गात त्यांचा दबदबा आणि  मान होता.
 दर्पण सुरु झाले          6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले दर्पण हे नियतकालिक सुरू केले.त्यासाठी त्यांना रघुनाथ हरिश्‍चंद्रजी आणि   जनार्दन वासुदेवजी यांचे सहकार्य लाभले .दर्पण अगोदर पाक्षिक होते. चार महिन्यानंतर ते साप्ताहिक  स्वरूपात प्रसिध्द होऊ  लागले.साडेआठ वर्षानंतर म्हणजे 26 जून 1840 साली दर्पणचा  शेवटचा  अंक प्रसिध्द झाला.नंतर दर्पण बंद पडले.दर्पणचे वर्गणीदार तेव्हा 300 .दर्पण  मराठी आणि इंग्रजीत प्रसिध्द होत असे.सरकारला आवडो अथवा न आवडो   दर्पणने अनेक  सामाजिक प्रश्‍न हाताळले.अनेक चळवळींना मदत  केली.त्यामुळं दर्पणचा दबदबा होता. लोकशिक्षण आणि ज्ञानप्रसार हा     दर्पणचा खर्‍या अर्थानं उद्देश होता. दिग्दर्शन मासिक सुरू ः   दर्पण बंद पडले.मात्र लिखाणाची उर्मी बाळशास्त्रींना स्वस्थ बसू देत  नव्हती.त्यामुळे त्यांनी  1 मे 1840 पासून दिग्दर्शन नावाचे मासिक सुरू  केले.पहिल्या मराठी मासिकाचे जनकही  बाळशास्त्रीच होते.हे मासिक पुढे  चार वर्षे चालले.पहिले
असिस्टंट प्रोफेसर ःएल्फिस्टन स्कुलमध्ये नोव्हेंबर 1834 मध्ये पहिले भारतीय असिस्टंट  प्रोफेसर म्हणून त्यांची  नियुक्ती केली गेली.नंतर त्यांनी अ‍ॅक्टींग प्रोफेसर   म्हणूनही काम पाहिले.पितामह दादाभाई  नौरोजी हे बाळशास्त्री यांचे विद्यार्थी होते.पहिले
मराठी शिक्षणाधिकारी ः  मुंबई इलाख्यातील दक्षिण विभागाचे पहिले मराठी शिक्षणाधिकारी   होण्याचा मान बाळशास्त्रींच्या नावावर नोंदविला गेला आहे.
कार्यमंत्री म्हणून नियुक्ती ः  त्याकाळात प्रतिष्ठित असलेल्या रॉयल एशियाटिक सोसायटी च्या मुंबई   शाखेतील भाषांतरकार  समितीचे कार्यमंत्री म्हणून त्यांची 1831 मध्ये   निवड झाली.जिऑग्राफिकल सोसायटीची मुंबई  शाखा सुरू झाली तेव्हा  त्याचे सन्माननिय सदस्यत्व जाभेकरांना दिले गेले.
पहिले सार्वजनिक वाचनालयः     वाचनाची आवड निर्माण व्हावी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने  त्यांनी बॉम्बे नेटीव्ह लायब्ररी सुरू केली.भारतीय व्यक्तीने सुरू केलेले ते   पहिलेच वाचनालय. लोकांनी आपली मतं निर्भिडपणे मांडावीत ,विचारांचे    आदान-प्रदान व्हावे यासाठी एखादे व्यासपीठ असावे असे त्यांना वाटे.त्यातून  त्यांनी नेटीव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी नावाची संस्था निर्माण केली.बाळशास्त्री  त्याचे पहिले अध्यक्ष.असा प्रयत्नही प्रथमच होत होता.कुलाबा वेधशाळेचेही ते  संचालक होते. 
जस्टीस ऑफ द पिस ः    शिक्षण,साहित्य,वृत्तपत्र,सामाजिक कार्यातील त्यांच्या् योगदानाची दखल   घेऊन त्यांची त्याकाळातील बहुमानाचा जस्टिस ऑफ द पिस या पदावर  नेमणूक केली गेली.त्यामुळं त्यांना हायकोर्टात ग्रॅन्ड ज्युरीमध्यम बसण्याचा अधिकार मिळाला.असे ते पहिले भारतीय.
 निधनः  बाळशास्त्री जांभेकरांचे अत्यल्प वयात म्हणजे अवघ्या वयाच्या 33 व्या वर्षी   निधन झाले कोकणात काही कामानिमित्त गेले असता त्यांनी विषमज्वराने   पछाडले.वेळीच  औषधोपचार झाला नाही.तापातच त्यांनी मुंबईपर्यंत प्रवास  केला.12 मे 1846 रोजी ते मुंबईत पोहोचले.तेथे ब्रिटिश डॉक्टरांनी त्यांच्यावर  उपचार केले मात्र 17 मे 1846  रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या    समकालीन इंग्रजी,बंगाली,गुजराथी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर मृत्यूलेख    लिहिले.सुप्रिम कोर्टातही त्यांना श्रध्दांजली वाहिली गेली. 
अष्टपौलू व्यक्तीमत्व ः  जीवनाच्या विविध प्रांतात त्यांनी चौफेर कामगिरी केली.मराठी  पत्रकारिता,गद्य निबंध   शिक्षण,अध्यापक शास्त्र.इतिहास    संशोधन,ग्रंथलेखन,सामाजिक कार्य,भाषांतर,भाषाप्रभू  विविध संस्थांचे संस्थापक अशा विविध नात्यानं लोकप्रिय असलेल्या बाळशास्त्रीजांभेकरांचे नाव आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून इतिहासात   नोंदवि 
9 भाषा अवगत ः      बाळशास्त्री खर्‍या अर्थानं भाषाप्रभू   होते.मराठी,संस्कृत,हिंदी,गुजराथी,कन्नड, बंगाली,या देशी भाषांबरोबरच   त्यांनी ग्रीक,लॅटीन,इंग्रजी,फेंच या परदेशी भाषाही अवगत होत्या.
संकलन …मराठी पत्रकार परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here