दोन मित्रांसाठी..दोन शब्द..

सुभाष चौरे आणि अनिल वाघमारे यांच्यात बरीच साम्यस्थळं आहेत.दोघंही बीड जिल्हयाच्या अतिमागास भागातून आलेले . .कौटुंबिक पार्श्‍वभूमी दोघांचीही सारखीच..जिल्हयातील पत्रकारातीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यापर्यंतचा जो जीवन प्रवास त्यांनी केला तो संघर्षांनी आणि काट्यांनी रेलचेल भरलेला होता.दोघंही मितभाषी ..दोघांनाही चिडलेलं,रागवलेलं मी कधी पाहिलेलं नाही.आपल्या मतांवर कायम ठाम  राहणारे आणि प्रसंगी कठोर भूमिका घेऊन निर्धारानं एखादा प्रश्‍न धसास लावणारे,पत्रकारितेत दुर्मिळ होत चाललेला प्रामाणिकपणा दोघांतही ओतप्रोत भरलेला आहे.सुभाष चौरे यांनी चंपावतीपत्रचे कार्यकारी संपादक म्हणून जिल्हयाच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविला आहे तर अनिल वाघमारे यांनी वडवणी सारख्या ग्रामीण भागातून डोंगरचा राजा हे पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा आणि ते निममित चालविण्याचा पराक्रम केला आहे.डोंगरचा राजा हे साप्ताहिक आज वडवणीचे मुखपत्र झाले आहे.अत्यंत संयतपणे,पत्रकारितेची सारी मूल्य आचरणात आणत,आपल्या भागाच्या विकासाची भूमिका घेत एखादे वृत्तपत्र कसे चालविता येते हे अनिल वाघमारे यांनी सिध्द करून दाखविले आहे.कोणासमोर ही  लाचारी न पत्करता पण सर्वांशी चांगले संबंध राखून अनिल वाघमारे पत्रकारिता करीत असल्यानं वडवणीत अनिल वाघमारेंबद्द कोणी नकारात्मक सूर काढताना दिसत नाही.नाही हा शब्द दोघांच्या कोषात नाही..संघटनेच्या किंवा सामाजिक कामासाठी चौरे किंवा वाघमारे यांनी काही बहाना केलाय असं मला कधी आठवत नाही.पदं भांडून घ्यायची आणि निष्क्रीय राहणारे कमी नाहीत पण चौरे ,वाघमारे यांच्याबाबत अशी चक्रार करायला जागा  नाही.दोघंही चांगले संघटक आहेत.जिल्हयात परिषदेची जी भक्कम फळी उभी राहिली आहे त्यात जिल्हयातील सर्वच पत्रकारांचे योगदान असले तरी या दोघांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणी नाकारणार नाही. सामाजिक जबाबदारीची जाणीव दोघांनाही आहे आणि मूळात मराठी पत्रकार परिषदेवर दोघांचीही श्रध्दा आहे.पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे,परस्परांना मदत केली पाहिजे अशी भूमिका घेऊन बीड जिल्हयात काम करणारे हे दोन्ही पत्रकार  परिषदेचे पदाधिकारी असण्यापेक्षा माझे जवळचे मित्र आहेत…

या दोन्ही मित्रांना त्यांच्या जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा..त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही शुभकामना 

एस.एम. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here