रायगडात जोरदार पाऊस

0
783

रायगड जिल्हयात आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस कोसळत असल्याने जिल्हयातील जनजीवन विस्कळित झाले आहे.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून जिल्हयातील सावित्री,पाताळगंगा,कुंडलिका,गाढी,अंबा या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वहात आहेत.येत्या 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्हयात सरासरी 104.48 मिलीमिटर पाऊस पडला आहे.पनवेलमध्ये सर्वाधिक 172.6 मिली मिटर पावसाची नोद झाली आहे.सलग तीन दिवस होत असलेल्या पावसामुळे जिल्हायीतील 28 पैकी 17 धरणं भरून वाहू लागली असून अन्य धरणंही 80 टक्क्याच्या वर भरली आहेत.
दरम्यान भात लावणीचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात लावणीची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here