नांदेड … अध्यक्षपदी पंढरीनाथ बोकारे

0
796
_
 
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी सलग्न असलेल्या
*महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ बोकारे, कार्याध्यक्षपदी कृष्णा उमरीकर तर सचिवपदी सुनिल पारडे*
 
नांदेड- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई’शी संलग्न असलेल्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शहर (महानगर) पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची तर कार्याध्यक्ष पदी कृष्णा उमरीकर व सरचिटणीस पदी सुनिल पारडे यांची निवड झाली आहे.
 
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेचे कार्यकारिणी सदस्य राम शेवडीकर,परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
नांदेड महानगर पत्रकार संघाची विस्तारीत कार्यकारिणी पुढिलप्रमाणे.. अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे,कार्याध्यक्ष- कृष्णा उमरिकर,सरचिटणीस- सुनिल पारडे, उपाध्यक्ष- नागनाथ देशमुख,किरण कुलकर्णी,मुक्तेश्वर पाटील,संदिप पतंगे,यासीन बेग इनामदार,सहसचिव- प्रशांत गवळे, कोषाध्यक्ष- संभाजी सोनकांबळे,सहकोषाध्यक्ष- राजेश शिंदे,जिल्हा प्रतिनिधी दत्ताहरी धोत्रे, प्रसिद्धी प्रमुख कुलदिप नंदुरकर,नरेश तुप्तेवार, महिला प्रतिनिधी सौ. अरूणा ढवळे व कार्यकारिणी सदस्य-जयप्रकाश नागला,आनंद कुलकर्णी,आयुब पठाण,ज्ञानेश्वर सुनेगावकर, दिपक बार्‍हाळीकर यांची निवड करण्यात आली.
 
कार्यकारिणीतील इतर पदांच्या निवडीसाठी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात यावी. या बैठकीत कार्यकारिणी निवडीची घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीतील रिक्त पदांच्या नियुक्तींचे अधिकार जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांना देण्यात आले.
 
या बैठकीस जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कालिदास जहागीरदार, उपाध्यक्ष सुभाष लोणे,प्रभाकर लखपत्रेवार,कोषाध्यक्ष रविंद्र कुलकर्णी,सहकोषाध्यक्ष राजेश परदेशी,कार्यकारिणी सदस्य महेंद्र देशमुख हे उपस्थित होते. निवडीबद्दल सर्व कार्यकारिणीचे परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख, सरचिटणीस यशवंत पवार, विश्वस्त किरण नाईक, कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्यासह परिषद पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.
???????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here