वाशिमः सरपंचाचा पत्रकारावर हल्ला

0
1004

दिवसातली दुसरी घटना

सांगोला येथे डीवायएसपीने एका पत्रकाराला केलेल्या मारहाणीने महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना असतानाच वाशिम जिल्हयातील मुंगळा येथे एका सरपंचाने पत्रकारावर केलेल्या हल्ल्याची घटना समोर आल्याने महाराष्ट्रात पत्रकारिता करणे किती कठीण झाले आहे हे सत्य पुन्हा समोर आले आहे.
मुंगळा हे गाव मालेगाव तालुक्यात आहे.पत्रकार नंदकुमार वनस्कर यांनी मुंगळा येथील ग्रामपंचायत स्वच्छता अभियानास खो या मथळ्याखाली बातमी दिली होती.ती आजच्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्यानंतर सरपंच दिगंबर पवार यांचे पित्त खवळले आणि त्यांनी भरचौकात पत्रकारास मारहाण केली.एवढेच नव्हे तर पुन्हा अशी बातमी दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे.आपणास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले अशी तक्रार वनस्कर यांनी मालेगाव पोलिसात दिली आहे.या घटनेची माहिती मिळताच गावातील सर्व पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी पोलीस उपअधिक्षक सपना गोरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी क्रांती ठोंबे यांनाही निवेदन दिले आहे.मात्र अजून सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here