अलिबागः रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि शेकाचे सररचिटणीस आमदार जयंत पाटील ,बँकेचे संचालक आणि व्यवस्थापकांच्या विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने रायगडि जिल्हयात खळबळ उडाली आहे.रायगड जिल्हा बँकेच्या एका खातेदाराच्या खात्यातून 1 कोटी 10 लाख 50 हजार रूपयांचे व्यवहार परस्पर केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला गेला आहे.शिवराज रामचंद्र भोसले असे तक्रारदाराचे नाव असून ते पुणे येथे व्यवसाय करतात.रोहा तालुक्यातील घगरवाडी येथे त्यांची जमिन असून शेतीच्या प्रकल्पासाठी त्यांनी 2012 मध्ये बँकेकडून दीड कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते.2015 पर्यंत त्यांनी कर्जाची निममित फेड केली मात्र नंतर त्यांचे हाप्ते थकले.त्यामुळे बॅकेने त्यांच्याविरोधात कलम 101 अन्वये कारवाई केली होती.तथापि भोसले यांच्या बचत खात्यात त्यांच्या परस्पर 1 कोटी 10 लाख 50 हजार रूपयांचे व्यवहार झाल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पनवेल पोलिसात तक्रार दिली आहे.तक्रारीनंतर तब्बल दोन महिन्यांनी काल हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.दरम्यान जयंत पाटील यांनी काल हा मुद्दा औचित्याच्या मुद्याव्दारे विधानपरिषदेत उपस्थित केला.पोलीस अधिकर्‍याला हाताशी धरून बॅकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यानी सभागृहात सांगितले.जिल्हयात मात्र हा विषय चर्चेचा बनला आहे.–

1 COMMENT

  1. जाहीर निषेध पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत

    विभागाने परीक्षा काळात परीक्षा केंद्रावर अथवा परिसरात परीक्षार्थी व परीक्षा संबंधित शिक्षक सोडता पत्रकारांना प्रवेश द्यायला हवा होता मात्र पत्रकार सुरू असलेल्या कॉपीचे पितळ उघफे पडतील म्हणूनच पत्रकारांना प्रवेश निषेध केला आहे

Leave a Reply to मचिंद्र मोरे पाटील Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here